मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर खुलणार या ५ राशींचे भाग्य, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल !

324

भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे आणि मकरसंक्रांत हा सण शेती संबंधित आहे. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. मकर संक्रांतीला सूर्याचे राशीमध्ये परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचा परिणाम १२ ही राशींवर होतो. त्यामुळे या आठवड्यात काही राशीच्या लोकांना अनपेक्षित अशा घटनांना सामोरं जावं लागणार आहे.

मेष – मेष राशीच्या लोकांचे स्वास्थ्य अगदी उत्तम राहील. कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत चांगला वेळ घालवता येईल. मन सन्मान प्राप्त होईल. नशिबाची जास्त साथ नसल्याने ठरवलेल्या कार्यांमध्ये जास्त यश प्राप्त होणार नाही, सोबतच मानसिक ताण देखील येईल. कामाच्या ठिकाणी स्थिती स्थिर असेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला लाभ होऊ शकतो. सुख वाढेल.

वृषभ – वाद विवादापासून दूर राहा, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य ठीक राहील. कार्यक्षेत्रामध्ये थोड्या अडचणी येण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य संबंधित त्रास होऊ शकतो. नशिबाची योग्य ती साथ मिळेल. शुभ कार्य संपन्न होऊन शांतता मिळेल. कामात योग्य ती प्रगती मिळेल. उच्च अधिकाऱ्यांकडून आपण केलेल्या कामाची प्रशंसा होईल, शाबासकी मिळेल. नोकरीसाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांमध्ये सफलता प्राप्त होईल. चांगले यश मिळून नावलौकिक वाढेल.

तूळ – नवीन व्यवसाय / नोकरीच्या संधी मिळू शकतात. आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न कराल आणि यशस्वीही व्हाल. कार्यक्षेत्रातील आणि कुटुंबातील वडील आणि वडीलधाऱ्या माणसांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत रहा, नशीब तुम्हाला साथ देत राहील. आपण कोणत्याही धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता.

वृश्चिक – पैशाची परिस्थिती चांगली बनू शकते. नवीन लोकांशी संपर्क येऊ शकतो जो आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आपण स्वत: साठी काही खरेदी करू शकता. व्यवसाय व नोकरी वर्गाच्या रहिवाशांसाठी हा आठवडा चांगला ठरू शकेल. तुम्ही या क्षेत्राशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात जास्तीत जास्त प्रवासाचा त्रास राहू शकेल.

कुंभ – या आठवड्यात आपले लक्ष मनोरंजन किंवा प्रवासाकडे अधिक असू शकते आणि आपण सुख सुविधांसाठी खर्च करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला काळ असू शकतो. जोडीदाराशी समन्वय चांगला राहील. नफ्याच्या नवीन परिस्थिती उद्भवतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे चांगले परिणाम मिळतील. मुलांकडून चांगली बातमी येईल, मानसिक गुंतागुंत झाल्यामुळे आरोग्य बिघडू शकते.

अस्वीकरण भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.