सोनाली बेंद्रेया मराठमोळ्या चेहऱ्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवले. तिचे अनेक चित्रपट तसेच त्यातील त्यांची गाणी सुपरहिट ठरली. सोनाली बेंद्रे ही मुळची मुंबईचीच. १९७५ मध्ये तिचा जन्म झाला. तिचे वडिल सरकारी नोकरीला होते. सोनालीला आधीपासुनच काहीतरी वेगळे करुन दाखवण्याची इच्छा त्यामुळे तिने तिचा मोर्चा मॉडेलिंग क्षेत्राकडे वळवला.
पुढे तिला गोविंदा आणि शिल्पा शेट्टीची प्रमुख भुमिका असलेल्या आग चित्रपटात सहायक्क अभिनेत्रीचा रोल मिळाला. पण खरेतर त्या आधी महेश भट्ट यांनी तिला नाराज या चित्रपटासाठी साइन केले होते. पण काही कारणास्तव त्या चित्रपटाचे शुटींग वेळेत पुर्ण झाले नाही त्यामुळे सोनालीने काम केलेला आग चित्रपट आधी प्रदर्शित झाला.
पुढे सोनालीने गद्दार चित्रपटात सुनील शेट्टीससोबत काम केले. चित्रपट तर खूप गाजला पण सोबतच सोनाली आणि सुनील शेट्टीच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. पुढे काही वर्षांनी सोनालीचे नाव मनसेप्रमुख राज ठाकरेंसोबत जोडले गेले. असे म्हणतात की, त्याकाळी राज ठाकरे यांनी सोनालीचे करियर सेट करायला खुप मदत केली होती.
पुढे सोनालीचे गोल्डी बहल सोबत लग्न झाले आणि एक मुलगा सुद्धा झाला. सर्व काही सुरळीत चालु असतानाच एक वाईट बातमी आली ती सोनालीला कॅन्सर झाल्याची. तिने स्वता सोशल मीडियावर या गोष्टीची कबुली दिली होती. पुढे तिचे अमेरिकेत उपचार चालु होते. आता ती या आजारातून बरी झाली असुन तिच्या कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन कमबॅक करत आहे. ती आपल्याला द ब्रोकन न्यूज या वेबसिरीज मध्ये दिसेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !