Headlines

रणवीर कपूरची होणारी बायको आलीय भट्ट आहे तब्बल एवढ्या करोड रुपयांची मालकीण, जाणून थक्क व्हाल !

बॉलिवुडची बबली गर्ल अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच कपूर खानदानाची सून होणार आहे. सध्या बीटाऊनमध्ये या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. आलिया मार्च मध्ये तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. कमी वयातच आलियाने तिच्या अभियन कौशल्यातुन चिक्कार पैसा कमावला. स्वताच्या हिमत्तीवर तिने करोडोची प्रोपर्टी उभी केली. अभिनेता रणबीर कपूरच्या होणाऱ्या बायकोकडे एक नव्हे तर तब्बल तीन अपार्टमेंट आहेत.

आलियाने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातुन तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यानंतर तिने एका पाठोपाठ एक उत्कृष्ठ कलाकृती इंडस्ट्रीला दिल्या. या मुळे तिची फि देखील वाढत गेली. सध्या ती तिच्या एका मुव्ही साठी २० करोड रुपये चार्ज घेते.

आलियाच्या नेटवर्थ बद्दल बोलायचे झाल्यास तिच्याकडे १० मिलियन डॉलर म्हणजेच ७४ करोड़ रुपयांची संपत्ती आहे. चित्रपटांशिवाय इव्हेंटस् आणि ब्रांड एंडोर्समेंटमधुन सुद्धा ती चांगली कमाई करते. तिची वार्षिक कमाई ही १० ते १२ करोड रुपये आहे तर महिन्याला ती ५० ते ८० लाख रुपये कमावते.

आलिया आता हॉलिवुड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे त्यामुळे तिचा इन्कम आता आणखी वाढेल. आरआआर सिनेमात तिचा रोल केवळ २० मिनीटांचा आहे पण तरीही तिने त्या मुव्हीसाठी ९ करोड रुपये चार्ज केले.

आलियाचा जुहूला एक शानदार अपार्टमेंट आहे. त्याची किंमत जवळपास १० करोडच्या आसपास आहे. याशिवाय वांद्रे येथे देखील तिचे अपार्टमेंट आहे. २४६० स्क्वेअर फिट मध्ये असलेल्या या अपार्टमेंटची किंमत ३२ करोड रुपये आहे. भारतातील या दोन अपार्टमेंट शिवाय लंडन मध्ये पण तिने एक कॉवंट गार्डन अपार्टमेंट नावाचे अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत ३१ करोड रुपये आहे.

आलियाला महागड्या गाड्यांची आवड आहे. तिच्याकडे लैंड रोवर रेंज,डी क्यू5 आणि ऑडी ए6 आहे. लैंड रोवर रेंज ची कीमत १.७४ करोड़ रुपये आहे. तर डी क्यू5 ची कींमत ७० लाख आणि ऑडी ए6 60 लाख रुपयांची आहे. या व्यतिरिक्त तिच्याकडे एक वैनिटी वैन पण आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !