अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची लेक सुहाना खान स्टारकिडसमध्ये खूप लोकप्रिय आहे. सुहानाने अजून इंडस्ट्रीत पदार्पणही केलेले नाही. तरी देखील तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोवर्स आहेत. ती सुद्धा अनेकदा आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सुहाना अनेकदा आपला नवा लूक शेअर करत असते. ते फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. तसेच त्यांना व्ह्यूज, लाइक्स देखील लाखोंच्या संख्येत मिळतात.
इतर स्टारकिड्सच्या मानाने सुहानावर पापाराझींचे जास्त लक्ष असतं. तिचे प्रत्येक क्षण टिपायला ते तिला फॉलो करत असतात. काही दिवसांपूर्वीच सुहाना मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅण्ट घातली होती. सुहानाच्या त्या लूकचे चाहत्यांनी खूप कौतुक केले.
सुहानाने आपला लूक पूर्ण करायला खांद्यावर एक गुलाबी रंगाची बॅग घेतली होती. त्या बॅगेने सुद्धा सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्याला देखील तशी बॅग हवी असा विचार करुन अनेक तरुणी सोशल मीडियावर ती बॅग सर्च करु लागल्या.
View this post on Instagram
सुहाना लवकरच द आर्चिस या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत श्रीदेवीची छोटी लेक आणि जान्हवी कपूरची बहिण खूशी कपूरदेखील पदार्पण करणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !