ऋषी कपूर यांच्या अंतिम क्रियेदरम्यान या कारणामुळे आलियाने हातात पकडलेला फोन !

1948

बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये निधन झाले. ऋषी कपूर यांच्या अंतिम क्रिये दरम्यान तेथे त्यांचा मुलगा रणबीर कपूर, पत्नी नीतू सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, अभिषेक बच्चन यांसोबत त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.
ज्यावेळी ऋषी कपूर वर अंतिम क्रिया चालू होती त्यावेळेस आलिया भट्ट तेथे उपस्थित होती आणि तिच्या हातात तिने फोन पकडला आहे असा फोटो खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे तिला ट्रोल देखील केले गेले की समोर अंतिम क्रिया चालू असताना ही मोबाइल घेऊन काय करते आहे! पण त्यामागील कारण समोर आले आहे.
एका रिपोर्ट मधून मिळालेल्या माहितीनुसार ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर दिल्लीला राहते. शिवाय सध्या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. त्यामुळे रिद्धीमा तिच्या वडिलांच्या अंतिम क्रियेसाठी मुंबईला येऊ शकली नाही. मुंबईला येण्यासाठी रिध्दीमा ने खूप प्रयत्न केले पण तिला येता आले नाही.
रिपोर्ट नुसार रिध्दिमा ला तिच्या वडिलांची अंतिम क्रिया बघायची होती. तिला तिच्या वडिलांना शेवटचे डोळे भरून पाहायचे होते. याच कारणामुळे आलियाने स्वतः च्या फोन मधून रिद्धिमा ला व्हिडिओ कॉल केला होता. या व्हिडिओ कॉल मधून रुद्धिमा दिल्लीमधून तिच्या वडिलांना शेवटचे पाहत होती.

हे वाचा – स्टार प्लसच्या या बालकलाकार आता झाल्या आहेत एवढ्या मोठ्या, एक आहे साऊथची मोठी हिरोईन !व्हिडिओ कॉल करते वेळी आलियाची अवस्था सुद्धा खूप बिकट होती. तिला तिचे रडू आवरत नव्हते. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात रणबीर कपूर ऋषी कपूर यांचे अंतिम क्रिया पार पाडत असताना दिसतो. हा व्हिडीओ आलियाने व्हिडिओ कॉल दरम्यान रेकॉर्ड केल्याचे म्हटले जाते.

हे वाचा – स्वतःचा बालपणीचा जुना व्हिडिओ बघून इमोशनल झाला हा अभिनेता, जाणून घ्या कोण आहे तो ?अंतिम क्रीये वेळी व्हिडिओ कॉल करण्याची अलियाची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही जेव्हा रणबीर कपूर ची आजी कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते त्यावेळी रणबीर तेथे उपस्थित राहू शकत नव्हता त्यावेळी देखील आलियाने रणबीरला व्हिडिओ कॉल करून अंतिम क्रियेचा हिस्सा बनवले होते.

हे वाचा – मरणानंतर या दोन अभिनेत्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एवढी संपत्ती पाठी सोडली !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !