लॉक डाऊन दरम्यान अरबाज खान आणि जॉर्जिया ने केले लग्न ? खुद्द अरबाजच्या गर्लफ्रेंड ने सांगितले सत्य!

547

अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या अरबाज अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी ला डेट करीत आहे. सध्या कोरोना मुळे देश लोक लॉक डाऊन केला आहे. त्यामुळे या लॉक डाऊन च्या काळात हे कपल एकत्र राहत आहेत अशी खबर मिळालेली आहे. अशातच अजून एक बातमी कानावर आली ती म्हणजे अरबाज खानने लॉक डाऊन दरम्यान जॉर्जिया सोबत लग्न केले आहे. या बातमीवर खुद्द त्याच्या गर्लफ्रेंडने म्हणजेच जॉर्जिया ने सत्य समोर आणले आहे.
स्वतःच्या लग्नाबाबत चर्चा ऐकून जॉर्जिया म्हणाली की तिच्या आणि अरबाजच्या लग्नाची बातमी खोटी आहे. लोक त्याच गोष्टीचा विचार करतात जे त्यांना चांगले वाटते. त्यामुळे मला या गोष्टीचा कुठलाच त्रास होत नाही. जर आमचे लग्न होणारच असेल तर आम्ही तुम्हाला आमच्या लग्नाबाबत नक्कीच सांगू. जॉर्जिया ने सांगितले लोकांना जो विचार करायचा आहे तो त्यांना करून देतो. विचार करण्याच्या प्रक्रियेपासून आपण कुणालाही अडवू शकत नाही.

हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार जॉर्जिया ने सांगितले की या लॉक डाऊन च्या काळात तिच्या आणि अरबाजच्या नात्यात कोणताही खास फरक पडलेला नाही. याआधीही आम्ही कित्येकदा एकत्र वेळ घालवलेला आहे त्यामुळे मी त्याला नीट ओळखते. हल्लीच जॉर्जिया ने तिचा इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती अरबाजची शेविंग करताना दिसत होती. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांसोबतच सेलिब्रिटिंना सुद्धा खूप आवडला.

हे वाचा – सलमान खान यांच्या वडिलांवर लॉकडाऊन मोडल्याचा ठपका, पण मिळालं हे उत्तर !टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार तिच्या लग्नामुळे चाललेल्या चर्चांमुळे ती अजिबात हैराण झाली नाही. या उलट तिने सांगितले की इंडस्ट्रीमधील एका नामांकित सेलिब्रिटीज सोबत रिलेशनशिपमध्ये असल्यावर अशा अफवांना सामोरे जावेच लागते. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला डेट करीत असाल जो आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहे तर तुम्हाला त्याच्या सोबत ना त्यात आल्यावर त्याच्या प्रसिद्धतेची जबाबदारी ही घ्यावीच लागते. पण ती या सगळ्यात खूश असल्याचे तिने सांगितले.

हे वाचा – बजरंगी भाईजान चित्रपटातील आईचे पात्र निभावणारी अभिनेत्री खरी कशी दिसते पहा !

अरबाज खान ने १९९८ मध्ये अभिनेत्री मलायका अरोरा सोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या १९ वर्षानंतर २०१७ मध्ये या दोघांनी कायमचे वेगळे होण्याचे ठरवले. आता मलायका आणि अरबाज दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सध्या मलायका सुद्धा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करीत आहे. अर्जुन आणि मलायकाच्या लग्नावर सुद्धा प्रत्येकाची नजर खिळून आहे.

हे वाचा – मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !