Headlines

रामायणातील ‘राम’ यांच्या मते हे बॉलिवुड कलाकार साकारू शकतात राम, सीता, रावण !

कोरोना मुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झाला त्यामुळे देशातील सर्व उद्योगधंदे ठप्प झाले. शिवाय त्याचा फटका टिव्ही इंडस्ट्री ला सुद्धा बसला. कारण सर्व मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण तातडीने थांबवण्यात आले. मग या काळात प्रेक्षकांना काय दाखवायचे म्हणून पूर्वीच्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना दाखवायचा ठरवले गेले आणि रामायण महाभारत यांसारख्या सुपर हिट मालिका पुन्हा प्रक्षेपित होऊ लागल्या.
यामुळेच या मालिकेतील कलाकार सुद्धा पुन्हा चर्चेत येऊ लागले आहे. रामायण मालिकेत लक्ष्मणा ची भूमिका करणारे अभिनेता सुनील लहरी यांनी एका मुलाखतीत त्यांना राम, सीता, रावण आणि हनुमानाच्या भूमिकेत कोणाला पाहण्याची इच्छा आहे हे बोलून दाखवले
रामायण मालिकेत सुनील लहरी यांच्या लक्ष्मणा च्या भूमिकेस लोकांचे फार प्रेम मिळाले. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सुनील यांनी सांगितले की जर आताचे बॉलिवुड कलाकार रामायणात असते तर कोण कोणत्या भूमिकेत फिट झाले असते.
सुनील यांचे म्हणने आहे की सिनेइंडस्ट्री शी जोडलेल्या कोणत्याही व्यक्तीस यातील पात्र करायचे झाल्यास त्या व्यक्तीस आधी आपण स्टार असल्याचे विसरावे लागेल. असे झाले नाही तर प्रेक्षक तुम्हाला त्या भुमिकेशी जुळवून घेऊ शकत नाही.
रामानंद सागर यांच्या रामायणात सर्वच कलाकार हे नवे होते. कोणताही कलाकार हा फारसा लोकप्रिय नव्हता.

हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !

त्यामुळेच लोकांनी जेव्हा आम्हाला बघितले तेव्हा त्यांनी जुळवून घेतले. सुनील यांच्या मते रामाची भूमिका अजय देवगण चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांच्या चेहऱ्यावर जो एक प्रकारचा भाव आहे तो या पात्रास अनुकूल आहे.

हे वाचा – रामायणातील या ५ कलाकारांनी घेतला आहे जगाचा निरोप, पहा आणखी कोण आहेत !
तर लक्ष्मण ही भूमिका हृतिक रोशन छान पार पाडू शकतो. ज्यावेळी सुनील यांना हनुमान आणि रावण कोण करू शकेल असे विचारले तेव्हा त्यांनी कोणत्याही कलाकाराचे नावं घेण्यास नकार दिला. त्यांचे असे म्हणणे आहे की रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी व्यतिरिक्त अमरीश पुरी करू शकले असते पण ते आता या जगात नाही.

हे वाचा – रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात काम करण्यासाठी ठेवल्या गेल्या होत्या या अटी !

सीता या भूमिकेसाठी दीपिका पादुकोण किंवा आलिया भट्ट चे नाव सुनील यांनी सुचवले. सुनील लहरी यांच्या आधी सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चीलखिया यांना बॉलिवुडधील कोणते कलाकार राम, सीता आणि रावणाची भूमिका करू शकतील असे विचारण्यात आले होते त्यावेळी त्यांनी सांगितले की राम हृतिक रोशन, सीता आलिया भट्ट आणि रावण अजय देवगण चांगले करू शकतील.

हे वाचा – रामायण बनवणारे रामानंद सागर यांचे कुटुंब कोठून आले आहे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी !

हे वाचा – रामायण मधील सीता आत्ता काय करते बघा, आणि पहा तिचे आत्ताचे फोटोज !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *