बॉबी देओल पेक्षा त्याच्या पत्नीची कमाई आहे आधिक, जाणून घ्या असे कोणते काम करते त्याची पत्नी !

8062

धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल याला कोण ओळखत नाही. बॉबी देओल चा जन्म २७ जानेवारी १९६९ साली झाला. आणि आता तो बॉलीवूड मधील एक जाणती व्यक्ती आहे. धर्मेंद्र यांचा मुलगा असूनही बॉबी देओल चे करिअर त्यांच्यासारखे किंवा त्याचा मोठा भाऊ सनी देओल सारखे यशस्वी झाले नाही. परंतु एक काळ असाही होता जेव्हा बॉबी देओल बॉलीवूड इंडस्ट्री गाजवत होता. परंतु आता त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली आहे.

या उतरत्या कळे मुळे बॉबी एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला दारूची भयंकर सवय लागली होती. परंतु या सर्वातून बाहेर पडण्यास त्याला त्याच्या बायकोने म्हणजेच तान्या देओलने मदत केली. तान्याने बॉबीला त्याच्या डिप्रेशन मधून बाहेर काढले आणि त्याला पुन्हा काम करण्यास प्रेरित केले.

एका मोठ्या ब्रेकनंतर बॉबीने सलमान खानसोबत ‘रेस ३’ या चित्रपटात काम केले आणि बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. त्यावेळी रेस ३ हा चित्रपट सुपरफ्लोप ठरला असला तरी त्या मधील कामामुळे बॉबीला हाउसफुल ४ या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु व हाउसफुलच्या सिरीज मध्ये हाउसफुल ४ हा चित्रपट तितकासा चालला नाही. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की चित्रपटांच्या बाबतीत बॉबीचे नशीब काही फारसे ठिक चालत नाही. कदाचित याच कारणामुळे बॉबीची पत्नी तान्या ही त्याच्यापेक्षा कमाई मध्ये वरचढ आहे.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल परंतु हे खरे आहे. सध्याच्या काळात तान्या बाबी हून अधिक कमाई करते. पाण्या एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिचा फर्निचर व होम डेकोरेटर्स व्यापार आहे. ‘द गुड अर्थ’ या नावाचे तान्याचे स्वतःचे एक शोरूम आहे. तिच्या शोरूम मधून अनेक मोठ्या कलाकारांच्या घरी फर्निचर चे सामान जात असते.

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाचा स्टोरीज मध्ये अनेकदा तान्याने डिझाईन केलेले फर्निचर दिसत असतात. तसे बघायला गेले तर तान्या हे जन्मापासूनच श्रीमंत आहे. तिचे वडील देवेन्द्र अहुजा २० th century finance limited चे मॅनेजर डायरेक्टर होते. त्यामुळे एका बिझनेस वुमन साठी लागणारे गुण हे तिच्यात लहानपणापासूनच अंगिकारले गेले.

बॉबीच्या अलिशान लाइफस्टाइलचा खर्च बहुतेकदा तान्याच करत असते. यात कोणतीही वाईट गोष्ट नाही. जसे एखादा नवरा त्याच्या बायकोसाठी करू शकतो त्याच प्रमाणे बायकोही नवऱ्यासाठी करू शकते आणि आता स्त्री पुरुष समानता मानणारे जग आहे त्यामुळे यात कोणतीच वावगी गोष्ट नाही.

बॉबी व तान्याची लव्ह स्टोरी सुद्धा खूप सुंदर आहे. बॉबी व तिची पहिली मुलाखत एका रेस्टॉरंटमध्ये झाली होते. आणि तिला बघताच क्षणी बॉबी हरपून गेला. त्यानंतर बॉबी रोज या रेस्टॉरंटमध्ये जायचा व तान्याबद्दल ची माहिती इतरांकडून जाणून घ्यायचा. हळूहळू त्याची व तान्याची मैत्री झाली व या मैत्रीचे रूपांतर शेवटी प्रेमात झाले.

बॉबी व तान्याचे लग्न १९९६ मध्ये झाले. या दोघांना आता आर्यमान व धर्म ही दोन मुले आहेत. सध्या हळूहळू का होईना बॉबीला काही चित्रपट मिळत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !