परदेसी परदेसी या गाण्यामुळे सुपरहिट ठरलेली अभिनेत्री आता जगत आहे एक गुमनाम आयुष्य !

2527

परदेसी परदेसी जाना नही…. मुझे छोड के … मुझे छोड के…. तुम्ही सर्वांनीच हे लोकप्रिय गाणे ऐकले असेल. २४ वर्षांपूर्वी आलेल्या राजा हिंदुस्तानी या चित्रपटा मधील हे गाणे आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार चालला होता. या चित्रपटात आमिर खान आणि करिष्मा कपूर प्रमुख भूमिकेत दिसले होते. चित्रपटांमधील परदेसी परदेसी हे गाणे इतके हिट होईल असे त्यावरील कोणालाच वाटले देखील नव्हते. या गाण्यात अमीर सोबत गाणं गाणारी खूबसूरत बंजारन सुद्धा लोकांचे लक्ष वेधून घेत होती. ती बंजारन अभिनेत्री प्रतिभा सिन्हा होती.
प्रतिभा ही एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी. मात्र प्रतिभा चे फिल्मी करिअर तिच्या आई इतके खास चालले नाही. तिने १९९२ मध्ये आलेल्या मेहबूब मेरे मेहबूब या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. ती आतापर्यंत केवळ 13 चित्रपटांमध्ये दिसली आहे. प्रतिभा ही विवाहित असलेल्या संगीतकार नदीम सैफी यांच्या प्रेमात वेडी होती. एवढेच नव्हे तर त्यांच्या चक्कर मध्ये प्रतिभाने स्वतःचे करिअर सुद्धा बरबाद करून घेतले.
यांच्या अफेअरची चर्चा मीडियामध्ये जोरदार चालायची. एका मुलाखतीत प्रतिभाने असे देखील म्हटले होते की ती लवकरच नदीम यांच्यासोबत निकाह करणार आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सर्वजण चकित झाले होते. मात्र त्यानंतर ती तिच्या वक्तव्यावर पलटली होती आणि म्हटले होते की आम्ही लग्न करणार नाही. प्रतिभाची आई माला सिन्हा यांना त्यांची मुलगी व नदीम यांचे नाते मंजूर नव्हते. त्यामुळेच नदीम आणि प्रतिभा एकमेकांशी बोलण्याकरता कोड वर्ड वापरायचे.
प्रतिभा यांचे कोड नेम ॲम्बेसिडर आणि नदीम चे Ace असे होते. ज्यावेळी मिडीयाला त्यांच्या या कोड नेम बद्दल माहित पडले त्यावेळी प्रतिभाने स्वतः त्यांचे नाते कबूल केले. या गोष्टीमुळे तिची आई खूप नाराज झाली होती. नदीम यांचे वैवाहिक असणे त्यांना खूप खटकत होते. त्यांनी त्यांच्या मुलीला थांबवण्याचा आणि समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र प्रतिभा त्यांचे ऐकण्यास तयार नव्हती. तर नदीम सुद्धा त्यांच्या प्रतिभा सोबतच्या अफेअरच्या चर्चा मुळे चिंतेत होते. रिपोर्टनुसार एकदा माला सिन्हा यांनी नदीम यांना फोन करून खूप शिव्या घातल्या होत्या. त्यानंतर प्रतिभाने तिच्या आई च्या वतीने नदीम यांची माफी मागितली होती.
नदीम यांनी एका मुलाखतीत सांगितले की या मायलेकी मिळून गेम खेळत आहेत. या दोघी माझ्या नावाचा उपयोग करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. नदीम यांचे म्हणणे होते की ते फक्त प्रतिभा ची मदत करू इच्छित होते कारण ती एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. नदीम यांनी सांगितले की आमच्या मध्ये तसे काहीच नव्हते. हे तेच नदीम आहेत ज्यांच्यावर गुलशन कुमार यांच्या हत्येचा आरोप लागला आहे.
हे वाचा – फिल्म इंडस्ट्री मधल्या या भावा बहिणींच्या जोड्या, काही ठरले हिट तर काही फ्लॉप !

प्रतिभाला सर्वात शेवटी १९९८ मध्ये आलेल्या मिलिटरी राजा या चित्रपटात पाहिले गेले. त्यानंतर तिचा काहीच आता पत्ता नाही. मीडियाच्या सूत्रानुसार ती सध्या तिच्या आईसोबत एक गुमनाम आयुष्य जगत आहे. प्रतिभाने तिच्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये कल की आवाज, दिल है बेताब, एक था राजा, तु चोर मै सिपाही, दिवाना मस्ताना, कोई किसीसे कम नही, जंजीर आणि मिलिटरी राज यांसोबत सर्व मिळून एकूण तेरा चित्रपटांमध्ये काम केले होते.

हे वाचा – चित्रपटातील चकित करणारी दृश्ये वास्तवात अशी चित्रित केली जातात !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !