ड्वेन जॉन्सन दुसऱ्यांदा बनला जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता, तब्बल एवढी आहे वर्षभरातील कमाई !

bollyreport
3 Min Read

फिल्मी जगतात असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे ओळखले जातात. पण तुम्हाला माहित आहे का चित्रपटामध्ये काम करणारे हे कलाकार एका चित्रपटात काम करण्यासाठी किती पैसे घेतात. त्यांची एका वर्षाची कमाई किती असते. सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता कोण आहे.
आज आज या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्या बद्दल थोडी माहिती देणार आहोत ज्याची एक वर्षाची कमाई ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. २०२० या वर्षातील जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्या बद्दल बोलायचे झाल्यास या यादीमध्ये हॉलिवूडच्या प्रसिद्ध ड्वेन जॉन्सन हा अग्रगण्य स्थानी येतो.

ड्वेन जॉन्सनला डब्ल्यूडब्ल्यूई च्या दुनियेत रॉक या नावाने ओळखले जाते. सध्या या दिवसात ड्वेन जॉन्सन त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सध्या तो अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच ड्वेन जॉन्सनचा द नेक्स्ट लेवल चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली होती. ड्वेन जॉन्सनची एक वर्षाची कमाई सुमारे ८७.५ मिलियन डॉलर इतकी आहे.
८७.५ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय किमतीत सुमारे ६५० करोड रुपये ! नुकतीच फोर्ब्सची जगभरातील सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांची यादी प्रदर्शित करण्यात आली या यादीमध्ये आठव्या स्थानावर बॉलीवूडच्या अक्षय कुमारने स्वतःचे स्थान निश्चित केले. ड्वेन जॉन्सन गेल्या वर्षी सुद्धा सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. आणि या वर्षी ही त्याने पहिला क्रमांक पटकावला.
सलग दोन वर्षे हे स्थान पटकावणे सोपी गोष्ट नव्हे. मात्र हे स्थान पटकावण्यासाठी ड्वेन जॉन्सन मेहनत सुद्धा तशी घेतो. ड्वेनच्या आगामी ‘रेड नोटिस’ या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने २३.५ दशलक्ष डॉलर दिले आहेत. शिवाय येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा काही प्रोजेक्ट द्वारे ड्वेन जॉन्सन हॉलीवूड मध्ये धमाल उडवून येताना दिसेल.
ड्वेन जॉन्सन बद्दल बोलायचे झाल्यास त्याचा जन्म २ मे १९७२ मध्ये झाला. कॉलेजच्या दिवसात जॉन्सन एक फुटबॉलपटू होता. मात्र बॉक्सिंग करण्याची प्रेरणा त्याला त्याचे आजोबा पीटर मैविया आणि वडील रॉकी जॉन्सन मुळे मिळाली. जॉन्सने द रॉक सेज या पुस्तकातून त्याची आ त्म क था मांडली आहे. हे पुस्तक २००० मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. हे पुस्तक न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांपैकी एक होते.
त्यानंतर २००२ मध्ये द स्कॉर्पियन किंग या चित्रपटाद्वारे ड्वेन जॉन्सनने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला त्यावेळी ५५ लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर त्याने द रन डाऊन, बी कुल, द गेम प्लॅन, गेट स्मार्ट, टूथ फेरी, दर गाईज यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.