Headlines

अजय सोबत नसतं जुळलं तर शाहरुख खान सोबत लग्न केले असते का ? या प्रश्नावर काजोलने दिले हे उत्तर !

बॉलिवुड मधील काजोल आणि शाहरुख खानची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडत आलेली आहे. काजोल आणि शाहरुखने आता पर्यंत जितके चित्रपट एकत्र केले आहेत ते सर्वच बॉक्स ऑफिसवर चांगलेच कमाई करणारे ठरले. या चित्रपटांनी जो रेकॉर्ड केला तो कदाचित आजपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही.

काजोल आणि शाहरुख या दोघांचे चाहते नेहमीच त्यांच्या खऱ्या आयुष्यातील बॉण्डींग जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळेच त्यांचे चाहते नेहमी त्यांना हा प्रश्न विचारात असतात. नुकतेच काजोलच्या एका चाहत्याने काजोलला विचारले की जर तुमच्या आयुष्यात अजय देवगण आले नसते तर तुम्ही शाहरुख सोबत लग्न केले असते का?
यावर काजोलने सुद्धा एकदम मोकळे उत्तर दिले. ती म्हणाली, त्यासाठी त्याने मला प्रपोज करायला नको का ? त्यानंतर एका चाहत्याने तिच्या आणि शाहरुखच्या नात्याबद्दल विचारले की तेव्हा तिने आयकॉनिक असे उत्तर दिले. या दोघांची जोडी बघून अनेकजणांना ते खऱ्या आयुष्यात सुद्धा असेच असते तर किती छान झाले असते असे वाटते.

पण तसे काही झाले नाही कारण काजोलने अजय सोबत लग्न केले. हे दोघे नेहमीच चर्चेत असतात. एवढेच नव्हे तर हे एकमेकांना छेडण्याची एकही संधी सोडत नाहीत.

काजोलच्या कामा बद्दल बोलायचे झाल्यास काजोलचा आधीचा चित्रपट तानाजी द अनसंग वॉरियरने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. या चित्रपटात ती तिच्या पती सोबत म्हणजेच अजय सोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *