या कारणामुळे काजोलची मुलं तिचे चित्रपट कधीच पाहत नाहीत, जाणून घ्या !

13285

बॉलिवुडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक काजोलने तिच्या फिल्मी करीयर मध्ये एकाहून एक सरस चित्रपटांमध्ये काम केले. याच कारणामुळे तिच्या चाहत्यांची संख्या करोडोच्या घरात आहे. काजोलने तिच्या २५ वर्षांच्या करीयर मध्ये स्वतःचे बरेच नावं कमवले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या मुलांना तिचे चित्रपट आवडत नाहीत.
एवढंच नव्हे तर तिच्या मुलांनी तिचा एकही चित्रपट पाहिलेला नाही. या सर्व गोष्टींचा काजोलने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला. चला तर मग जाणून घेऊ काजोलच्या मुलांना तिचे चित्रपट का आवडत नाहीत ?
बॉलीवूड अभिनेत्री काजोल चे चित्रपट सर्वांनाच आवडतात. तिच्या चित्रपटांत रोमान्स सोबतच भावनिक आशय सुद्धा खूप असतो. याच कारणामुळे प्रेक्षकांनी खूपदा जरी ते चित्रपट पाहिले तरी त्यांना कंटाळा येत नाही. पण काजोलच्या दोन्ही मुलांनी तिचे चित्रपट कधीच पाहिलेले नाही. मातृ दिना निमित्त घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत काजोलने हे स्वतः सांगितले आहे. या मागचे कारण ऐकून तिचे चाहते हैराण झाले आहेत.
मुलाखतीत काजोलने सांगितले की, आजपर्यंत माझ्या मुलांनी माझे कोणतेच चित्रपट पाहिलेले नाही. ते असे का करतात असा प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी साधेपणाने उत्तर दिले, ते असे बोलले की मी इतकेही जास्त चित्रपट केले नाहीत आणि दुसरे कारण म्हणजे मी माझ्या चित्रपटात खूप रडते हे माझ्या मुलांना आवडत नाही त्यामुळे ते माझे चित्रपट पाहत नाही.
काजोलची तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही ती अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलली आहे. तिच्या मुलांबद्दल बोलताना काजोलने सांगितले की माझ्या दोन्ही मुलांमुळे मी खूप काही शिकले. माझी मुलं माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्यात खूप चांगले बदल घडले.

हे वाचा – सलमान खानला किस करू इच्छिते ही अभिनेत्री, तसेच बोलून दाखवल्या मनातल्या इच्छा !

माझ्या मुलांनी मला नेहमी खुश राहण्यास शिकवले. तिच्या बोलण्यातून तुम्ही अंदाज घेऊ शकता की तिच्या मुलांच्या किती जवळची आहे. काजोल नेहमी तिच्या मुलांची खूप काळजी घेते. मात्र जिथे मुलं चुकतात तेथे त्यांना शिक्षा करण्यात किंवा त्यांना ओरडण्यात ती कधीच मागेपुढे पाहत नाही. याबद्दल अजय देवगण ने बरेचदा सांगितले आहे की ती किती शिस्तप्रिय आहे. अजयच्या मते काजोल ही एक प्रेमळ तसेच शिस्तप्रिय आई आहे जी नेहमीच मुलांना काळजीने धाकात ठेवते.

हे वाचा – मरणानंतर या दोन अभिनेत्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एवढी संपत्ती पाठी सोडली !

काजोल नेहमीच शक्य होईल तितका तिच्या मुलांसोबत वेळ घालवते. काजोल मुलांसोबत वेळ घालवतानाचे फोटो अनेकदा व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये आई आणि मुलांमधील अनोखे प्रेमसंबंध पाहण्यास मिळतात. काजोलच्या करीयर बद्दल बोलायचे झाल्यास तिने नुकतेच खूप काळानंतर कम बॅक केले आहे.

हे वाचा – स्टार प्लसच्या या बालकलाकार आता झाल्या आहेत एवढ्या मोठ्या, एक आहे साऊथची मोठी हिरोईन !काजोलला शेवटी तानाजी द अनसंग वॉरियर मध्ये पाहिले गेले. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण आणि सैफ अली खानने सुद्धा काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला.

हे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !