Headlines

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाचे Exclusive HD फोटोज पहा !

सध्या सोशल मीडियावर सगळीकडे कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. ७ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थचा लग्न सोहळा पार पडला. जैसलमेर मधील सूर्यगड पॅलेस या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला सूर्यागड पॅलेसचे फोटो सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी या पॅलेस ला विशेष पद्धतीने सजवले गेले होते. अगदी ग्रँड पद्धतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांनी लग्न केले.

शेरशाह या चित्रपटामध्ये कियारा आणि सिद्धार्थ या दोघांनी एकत्र काम केले होते. आणि आता हे दोघे कायमचे एकमेकांसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. स्टार कपल आणि त्यांचे लग्न हा नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

कियारा आणि सिद्धार्थची जोडी देखील म्हणूनच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला बॉलीवूड मधले अनेक अभिनेते अभिनेत्री उपस्थित होते. यामध्ये शाहिद कपूर त्याची बायको मीरा, करण जोहर, जुही चावला, मनीष मल्होत्रा यासारख्या अनेक सेलिब्रेटींचा समावेश होता.

राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणं हल्ली हा ट्रेंड बनला आहे. विकी कौशल- कत्रिना कैफ, निक जोन्स – प्रियांका चोप्रा, रविना टंडन, श्रिया सरन यासारख्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी राजस्थान मध्ये आपले ड्रीम वेडिंग केले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचे लग्नामध्ये घातलेले सगळे ड्रेस हे मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेले होते.

राजस्थानहून आल्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ मुंबईत देखील एक फंक्शन करणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट २०१८ मध्ये झाली होती. यानंतर ते दोघे सतत टच मध्ये होते. शेरशहा या चित्रपटांमध्ये दोघांनी ऍज अ कपल म्हणून काम केले आहे.

मेहंदी सेरेमनी, संगीत सेरेमनी, चुडा सेरेमनी अशा पद्धतीने प्रत्येक रिच्युअल फॉलो करत सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न पार पडले आहे. कियाराच्या घरातल्यांनी संगीत सेरेमनीला कियारासाठी एक स्पेशल परफॉर्मन्स सेट केला होता. सिद्धार्थ आणि कियारा दोघांच्याही घरच्यांनी या लग्नामध्ये खूप एन्जॉय केले.

आणि अजूनही अनेक रिच्युअल्स ते करत आहेत. कियारा आणि सिद्धार्थच लग्न खऱ्या पद्धतीने ग्रँड ठरले. या लग्नामध्ये दहा देशातील शंभरहून अधिक पदार्थ होते. सूर्यगड पॅलेस पूर्ण फुलांनी सजवण्यात आला आहे. आणि चारही बाजूंनी सिक्युरिटी देखील दिली आहे.

लग्नाच्या सेरेमनी सुरू असताना कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ बाहेर लीक होणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. एवढ्या असून सुद्धा काही फोटो लीक झाले त्यामुळे याचा सुरक्षा बंदोबस्त आणखीनच वाढवण्यात आला.

या पॅलेस मधल्या सगळ्या नोकऱ्यांना विशिष्ट प्रकारचे मोबाईल कव्हर देखील देण्यात आले होते जेणेकरून यामध्ये त्यांचे कॅमेरे देखील बंद होतील. आणि बाहेर कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ लिंक होणार नाहीत. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी कीयाराची खास मैत्रीण निशा अंबानी देखील जैसलमेरमध्ये आली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !