Headlines

वयाच्या ६३व्या वर्षी अभिनेता नागार्जुन करत आहे सुनेच्या वयाच्या मुलीसोबत रोमान्सचे सीन, पहा फोटोज !

जिथे सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड ही मागणी ट्रेंड होत असताना साऊथकडीस सुपरस्टारर्सना मात्र बॉलिवूडचे वेध लागले आहेत. त्यामुळे या कलाकारांच्या पायगुणाने तरी बॉलिवूडला लागलेली उतरती कळा सुधारते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांत अनेक साऊथकडील कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

साऊथचा सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन लवकरच बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानसोबत ‘द घोस्ट’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता, त्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे आणखी काही फोटो समोर आले आहेत ज्यात नागार्जुन आणि सोनम चौहान यांच्यात घट्ट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

नागार्जुन आणि सोनल चौहान पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसणार आहेत. चित्रपटातील हे फोटो पाहिल्यानंतर ही नवीकरी जोडी आपल्या जबरदस्त केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल असेच वाटते. फोटोंमध्ये अभिनेता अक्किनेनी नागार्जुनने सोनल चौहानला मिठीत घेतले आहे.

हे फोटो चित्रपटातील ‘वेगम’ गाण्यातील आहेत. हे चित्रपटातील रोमँटिक गाणे आहे. या गाण्याचे पोस्टर चित्रपटाची प्रमुख नायिका सोनलने शेअर केले. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, की, ‘रोमान्ससाठी तयार व्हा. रोमँटिक सिंगल ‘वेगम’ 16 सप्टेंबर रोजी हे पोस्टर रिलीज झाले. पोस्टरवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी ते खूप उत्सुक दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Buzz (@bollytellybuzz)


या चित्रपटातील नागार्जुनच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचे तर तो इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याची जबरदस्त अॅक्शन आणि रोमान्स या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर सोनल एका शिस्तप्रिय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonal Chauhan (@sonalchauhan)


चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर काजल अग्रवाल, सोनल चौहान, नागार्जुन, गुल पनाग, अनिखा सुरेंद्रन, मनीष चौधरी, रवि वर्मा आणि श्रीकांत अय्यंगार यांच्या महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण सत्तारू यांनी केले आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !