विराट कोहली अनुष्का शर्माला देईल का घटस्पोट ? काय आहे प्रकरण जाणून घ्या !

25950

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची जोडी नेहमीच मिडियामध्ये चर्चेचा विषय ठरते. नुकतीच अनुष्का शर्मा निर्मित ॲमेझॉन प्राईमची नवी कलाकृती ‘पाताळलोक’ ही वेब सिरीज प्रदर्शित झाली. ही वेब सिरीज काही नकारात्मक कारणांमुळे चर्चेचा विषय बनत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते नंदकिशोर गुर्जर ने अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्मा विरुद्ध वेब सिरीज पाताळलोक मध्ये त्यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप खाली एफआयआर नोंदवली. असे म्हटले जाते की त्यांच्या परवानगीशिवाय ॲमेझॉन प्राईम वर स्ट्रिम केली जात आहे.
नंदकिशोर यांनी पाताळलोक च्या स्ट्रीमिंग वर प्रतिबंध लावण्यासाठी सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र सुद्धा लिहिले. त्यांनी कथित रूपात संप्रदायात हालचाल निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा नियमांतर्गत तक्रार सुद्धा नोंदवली आहे.
त्यांनी अनुष्का वर देशद्रोहाचा आरोप लावला आहे. एवढेच नव्हे तर नंदकिशोर गुर्जर यांनी न्यूजरूम पोस्ट सोबत बोलताना भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीला त्याच्या पत्नीला घटस्फोट देण्याचे सुद्धा सुचवले आहे. नंदकिशोर यांनी म्हटले की विराट कोहली हा एक देशभक्त आहे आणि तो देशासाठी खेळतो त्यामुळे त्याने अनुष्काला घटस्फोट घेणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वीच एका शोमध्ये अनुष्काला एक जातीवादी शिवी दिल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. वीरेन श्री गुरुंग जे लायर्स गिल्डचे सदस्य आहेत त्यांनी अनुष्का आणि तिचा भाऊ कर्नेश शर्माला लीगल नोटीस पाठवली होती. ते त्या शोचे कार्यकारी निर्माता होते.
अशा काळात विराट अनुष्काला घटस्फोट देणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पाताळ लोक या वेब सिरीज मध्ये जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बनर्जी, गुल पनाग, स्वस्तिका मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात शेवटी ती शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ सोबत झिरो या चित्रपटांमध्ये दिसली होती. मिळालेल्या रिपोर्टनुसार अनुष्का माजी भारतीय क्रिकेट टीम ची कॅप्टन झुलन गोस्वामी यांच्या बायोपिक साठी क्रिकेटर बनण्याची तयारी करत आहे.

हे वाचा – विराट कोहलीने अनुष्का शर्माला कधीच लग्नाची मागणी घातली नाही, विराटने केला खुलासा !