Headlines

जुदाई चित्रपटातील हा निरागस मुलगा झाला आहे बॉलिवूडमधील मोठा कलाकार, नाव वाचून थक्क व्हाल !

चित्रपट असो किंवा मालिका नेहमीच या मनोरंजन क्षेत्रात बालकलाकारांची जादू चालत आलेली आहे. हे बालकलाकार नेहमीच त्यांच्या निरागस अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकून घेत असतात. हे बाल कलाकार खूप कमी वयात कॅमेऱ्याला सामोरे जातात. त्यामुळेच अभिनयाची सवय ही त्यांच्या अंगवळणी पडते.
आपण अशा अनेक चित्रपट किंवा मालिकांमध्ये बाल कलाकारांना पाहिले असेल ज्यांचा अभिनय तुमच्या मनात घर करून बसला असेल. आज आम्ही तुम्हाला अशा एका बॉलिवुड अभिनेत्या बद्दल सांगणार आहोत जो जुडाई चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसला होता. आज आपण बोलत आहोत ते जूदाई चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेल्या ओमकार कपूरची. तो आता एक सुपरस्टार झाला आहे.
आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की बॉलिवुड मधील बालकलाकार हे चित्रपटातील नायक किंवा नयिके पेक्षा जास्त भाव खाऊन जातात. आणि त्यातीलच काही जण पुढे अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून प्रमुख भूमिकेत दिसतात. शिवाय सध्या टिव्ही किंवा चित्रपटात दिसणाऱ्या अनेक कलाकारांना आपण आधी सुद्धा पाहिलेले असते पण त्यांच्या बदललेल्या लूक मुळे आपल्याला ते ओळखता येत नाही.

हे वाचा – डिज्नी चैनल वरील सहा बाल कलाकार आता कसे दिसतात ? यातील एक आहे करोड रुपयांची मालकीण !असेच काहीसे जूदाई चित्रपटात काम करणाऱ्या ओमकार कपूर सोबत झाले. तो आता मोठा होऊन एक सुपरस्टार झाला आहे. पण आपण त्याला ओळखू शकत नाही. नुकतेच त्याला एका चित्रपटात पाहिले गेले मात्र त्याला बघून असे वाटणार नाही की तो तोच मुलगा आहे ज्याने जूदाई चित्रपटात काम केले होते. ओमकार कपूरचा बालपणीचा अभिनय पाहून त्याची फॅन फॉलोविंग ही एखाद्या मोठ्या कलाकारासारखी झालेली.

हे वाचा – एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !

ओमकार आता मोठा झाला असून तो खूप हँडसम दिसतो. जूदाई चित्रपटात त्याने अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केली होती. हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि हिट सुद्धा ठरला. या चित्रपटातील त्यांनी निरागसता आणि सहज अभिनय पाहून प्रेक्षकांची मने जिंकण्यास तो यशस्वी झाला.

हे वाचा – देशातील सर्वात सुंदर महिला साध्वी, जिचे सौदर्य पाहून तुम्ही हरवून जाल !या चित्रपटात ओमकार ने ‘छोटा बच्चा जान के कोई आंख दिखाना रे’ हे गाणे गायले होते. हे गाणे आज देखील खूप आवडीने म्हटले जाते. शिवाय जुडवा या चित्रपटात ओमकार ने सलमान खानच्या बालपणीची भूमिका केली होती. नुकतेच ओमकार ने बॉलिवुडच्या प्यार का पंचनामा 2 या चित्रपटात काम केले. तसेच आज का नन्हा फरिश्ता, दिल चुराया आपणे, यू, मी और घर, झुठा कही का यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

हे वाचा – सलमान खान यांच्या वडिलांवर लॉकडाऊन मोडल्याचा ठपका, पण मिळालं हे उत्तर !ओमकार आता मोठा होऊन पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवण्यास सज्ज झाला आहे. तो पुन्हा एकदा त्याचा जलवा दाखवेल अशी आशा करण्यास काहीच हरकत नाही.

हे वाचा – बजरंगी भाईजान चित्रपटातील आईचे पात्र निभावणारी अभिनेत्री खरी कशी दिसते पहा !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *