Headlines

नाही म्हणत होती करीना पण योग आला कि जुळून, सैफ अली खानच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलणार !

करीना कपूर खान हे असे नाव आहे जे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. कपूर कुटुंबाची लाडकी लेक आणि पतौडी खानदानाची सून असलेली करीना तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करीनाने दोन वर्षांपूर्वीच सोशल मीडियावर डेब्यू केला होता.

तेव्हापासून ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आज करीना कपूरने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असलेली करीना कपूर दररोज तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकताच करिनाने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती सैफ आणि अन्य कुणाएका व्यक्तीसोबत दिसत त्याचा हा फोटो लंडनमधील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर पती सैफ अली खान सोबत लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. त्यांच्यासोबत करीनाची बहीण करिश्मा कपूर आणि तिची मैत्रिण अमृताही आहे. करिनाने नुकताच लंडनमधील एक फोटो शेअर केला आहे, मात्र धक्कादायक बाब म्हणजे या फोटोमध्ये करिनाचा बेबी बंप दिसत आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. करीनाने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर करीना कपूर आई होणार असल्याचे बोलले जात आहे.

करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. तिच्या या फोटोवर चाहते खूप कमेंट करत आहेत. हा फोटो व्हायरल होत असल्याने सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. त्यांनाही करीना कपूर प्रेग्नंट असल्याचे वाटते. पण इन्स्टाग्रामवरील तिच्या काही फॅन क्लबने शेअर केलेले फोटो पाहिल्यास तिचे पोट सपाट दिसत आहे.

एकाच कपड्यांवरील दोन वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हायरल झाल्यामुळे चाहते खूप गोंधळले आहेत. एका फोटोत करीनाचा बेबी बंप दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तिचा बेबी बंप दिसत नसून पोट सपाट दिसत आहे. त्यामुळे ती नक्की प्रेग्नेंट आहे की नाही हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे.

मात्र यावर करीना किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. करीनाने शेयर केलेल्या प्रत्येक फोटोत ती आपले पोट लपवत असल्याचे दिसत आहे. त्यावरून हा अंदाज लावण्यात आला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !