शाहिद कपूर आणि करिनाच्या ब्रेकअपचे कारण होत्या करिष्मा कपूर आणि बबिता !

1243

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले कपल म्हणजे शाहिद कपूर आणि करिना कपूर खान. या दोघांच्या ब्रेक अप ला आता तेरा वर्षे पूर्ण होतील. परंतु यांच्या ब्रेकअप मुळे निर्माण होणाऱ्या नवनवीन कथा काही थांबायचे नावच घेत नाही. शाहिद आणि करीना यांची लव्ह स्टोरी तेव्हा सुद्धा चर्चेचा विषय होती आणि आता या दोघांचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न झाले तरीही चर्चा काही थांबत नाही. शाहिद आणि करीना ची लव्ह स्टोरी २००४ मध्ये सुरू झाली आणि २००७ मध्ये संपली होती.
एका रिपोर्टनुसार शाहिद आणि करिना यांच्या ब्रेकअप चे कारण करीनाचे आई बबीता आणि बहिण करिष्मा कपूर आहे असे सांगितले जाते. बबिता आणि करिष्मासाठी शाहिद कपूर त्यांच्या स्टेटस् ला मिळता जुळता नाही असे वाटत होते. तसे बघायला गेले तर शाहिद कपूर सुद्धा बॉलिवुडच्या एका परिचित परिवारातील मुलगा आहे. परंतु तरीही करिष्मा कपूर आणि बबिता यांना शाहिद त्यांच्या तोलामोलाचा वाटत नव्हता. शिवाय त्यावेळेस शाहीदचे अनेक चित्रपट फ्लॉप सुद्धा होत होते.
एक काळ तर असा होता ज्यावेळेस करीना आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यांनी त्यावेळेस एकमेकांसाठी त्यांच्या सवयी सुद्धा बदलून घेतल्या होत्या.
करीना शाहिद साठी शाकाहारी झाली होती आणि शाहिदने सुद्धा करीना साठी स्वतः ची पर्सनालिटी खूप चांगल्या पद्धतीने बदलली होती. त्यावेळी करीना प्रत्येक दिग्दर्शकास तिच्या अपोजिट शाहिदला चित्रपटात घेण्याची विनंती करायची. जब वी मेट या चित्रपटा मधून या दोघांची प्रेमाची केमिस्ट्री खूप चांगल्या प्रकारे लोकां समोर आली होती.
असे म्हटले जाते की करीना आणि शाहिद मध्ये जब वी मेट या चित्रपटाच्या सेट वर भांडण व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर करीना सैफ सोबत टशन या चित्रपटाचे चित्रीकरण लडाख मध्ये करत होती. त्याच वेळी सैफ व करीनाचे प्रेमप्रकरण सुरू झाले.
काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये करीनाने तिच्या व शाहीदच्या ब्रेकअप बद्दल सांगितले की त्यावेळी आमच्या रिलेशन बाबत नशिबाची काही वेगळी मर्जी होती आणि जीवनाने काही वेगळेच ठरवले होते. जब वी मेट हा चित्रपट बनते वेळी अशा अनेक गोष्टी घडल्या त्यामुळे आम्ही वेगळे होत गेलो. आणि त्यानंतर जब वी मेट सारखा सुंदर चित्रपट सर्वांसमोर आला. टशन सारखा चित्रपट मला आधीपासूनच करायचा होता. टशन या चित्रपटामधून माझी आणि सैफ ची ओळख घट्ट होत गेली. जब वी मेट या चित्रपटाने माझे करीयर बदलून टाकले आणि टशन या चित्रपटाने माझे जीवनच बदलून टाकले.
करीना कपूर आणि सैफ अली खान ने २०१२ मध्ये लग्न केले त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमूर ला जन्म दिला. तर शाहिद कपूर ने २०१५ मध्ये मीरा राजपूत सोबत लग्न केले. या दोघांना आता मिशा आणि झैन अशी दोन मुले आहेत.