Headlines

अभिनेत्री ‘शर्लिन चोपडा’ने केला धक्कादायक खुलासा, निर्माते रात्री उशिरा घरी बोलवायचे आणि ….

फेब्रुवारी महिन्यापासून भारतात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाव्हायरस पासून वाचण्यासाठी संपूर्ण देशभर लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. यामध्ये सर्वात वाहतूक, कारखाने, इंडस्ट्री, टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्री या सर्वच गोष्टीवर बं दी घालण्यात आली होती. पण आता देशात लॉक डाऊन संपून आता अनलॉक २ सुरू झाले आहे. कोरोनाव्हायरस मुळे अनेकांच्या पोटावर पाय येऊन त्यांच्या नोकऱ्या गेल्या. फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना काम मिळणे मुश्किल झाले आहे.
दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा ने स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर लॉन्च करून एक मोठा खुलासा केला आहे. शर्लिनने तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव रेडशेर असे ठेवले आहे. हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केल्यानंतर तिने तिचे जुने दिवस आठवत काही गोष्टींचा खुलासा सुद्धा केला.

शर्लिनने सांगितले की एक काळ होता जेव्हा ती काम मागण्यासाठी वेगवेगळ्या निर्मात्यांना जाऊन भेटायची. त्यावेळी  निर्माते रात्री उशिरा घरी बोलवायचे आणि  मला रात्री जेवायला ये असे म्हणून रात्री यायला सांगायचे. सतत अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून मी खूप हैराण झाले होते. या सर्व गोष्टी पासून वाचायचे असल्यास स्वतःला आत्मनिर्भर करण्याची गरज आहे असे मला त्यावेळी जाणवले म्हणून मी स्वतः कंटेंट क्रियेटर आणि निर्माती झाली. आता मी स्वतः एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म मालकीण आहे त्यामुळे या प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रीप्शन च्या किंमतीनुसार प्रेक्षकांना चांगला कंटेंट देण्याची माझी जबाबदारी असल्याचे शर्लिनने सांगितले.
लोकांना या प्लॅटफॉर्मवर भरपूर मनोरंजन मिळेल शिवाय या प्लॅटफॉर्म ची किंमत प्रेक्षकांच्या बजेटमधील असेल. सध्या या प्लॅटफॉर्मवर ग्लॅमरस व्हिडिओ आणि स्लाईड शो दाखवण्यात येतील. मात्र पुढे येथे शॉर्टफिल्म आणि वेब सेरीज सुद्धा पाहण्यास मिळतील.
शर्लिन चोपडा ही भारतातील पहिली महिला आहे जिने प्ले बॉ य या मॅगझिन साठी न्यू*ड फोटोशूट केले होते. आता ती एक बिझनेस वूमन बनली आहे. भारत-चीन तणावामुळे काही दिवसांपूर्वीच शर्लिनने चिनी वस्तूंवर ब हि ष्का र टाकला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !