Headlines

इंस्टाग्रामवर पोस्ट करून कलाकार मिळवतात तब्बल एवढे पैसे, वाचून अवाक व्हाल !

हल्ली सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे आपण पूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेकांपर्यंत पोहचत असतो. सामान्य लोकांपासून ते आपल्या आवडत्या कलाकारांपर्यंत सगळेच या सोशल मीडिया वर सक्रिय असतात. चित्रपट सृष्टीतील अभिनेते – अभिनेत्री हे सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात व आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.
इंस्टाग्राम वर हे कलाकार आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनाबद्दल बोलत असतात, पोस्ट करत असतात. आपण विचार करत असू की हे इतके मोठे, प्रसिद्ध कलाकार असले तरी ते इंस्टाग्रामवर पोस्ट का करतात? आपल्याला माहित आहेच की प्रत्येक कलाकाराचे अनेक चाहते असतात. तर याच चाहत्यांसोबत आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कळवण्यासाठी हे कलाकार आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात.
आपण अनेकदा इंस्टाग्रामवर पोस्ट बघितली असेल की “paid partnership with.. ” आणि पुढे त्या विशिष्ट ब्रँडचं नाव असतं. तरं कलाकार हे इंस्टाग्रामवर स्पॉन्सर्ड पोस्ट देखील करत असतात आणि अशा पोस्ट्स साठी त्यांना त्या ब्रँडकडून मानधन मिळत असते. तर पाहूया मग असे कोणते कलाकार आहेत जे इंस्टाग्रामवर अशा पोस्ट करून मानधन मिळवतात.
१) प्रियंका चोप्रा –
हिंदी तसेच हॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील इंस्टाग्रामवर सक्रिय असते.
इंस्टाग्राम स्पॉन्सर्ड पोस्ट करून अधिक मानधन मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर तिचे ५ करोडपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. प्रियांका चोप्रा इंस्टाग्रामवर स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी एका पोस्टमागे २ करोड इतके मानधन स्वीकारते.
२) आलिया भट्ट –
स्पॉन्सर्ड पोस्ट करून मानधन मिळवणारी आलिया भट ही दुसरी अभिनेत्री आहे. आलियाचे इंस्टाग्राम वर ४५ दशलक्ष इतके फॉलोवर्स आहेत. आलिया आपल्या जीवनातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर एक स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी ती १ करोड इतके मानधन घेते.
३) नेहा धूपिया –
नेहा धूपियाने अनेक चित्रपटांतून आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा नमुना दाखवला आहे. तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे सिंह इज किंग, चुप-चुप के, कयामत. सध्या चित्रपटांपासून दूर असली तरीही काही कथाबाह्य कार्यक्रमांमधून आपण तिला पाहत असतो. इंस्टाग्रामवर देखील ही अभिनेत्री फार सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर ४ दशलक्ष फॉलोवर्स आहेत आणि ती इंस्टाग्रामवर एक स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी १.५० लाख इतके मानधन घेते.
४) सोनाक्षी सिन्हा –
दबंग या चित्रपटापासून सोनाक्षीने चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. हल्लीचे तिचे चित्रपट इतके हिट ठरले नाहीत परंतु सोशल मीडियावर ती तितकीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे १९ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर ती स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी ५ लाख इतके मानधन घेते.
५) शाहरुख खान –
हिंदी चित्रपट सृष्टीतील किंग खान म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खान हा चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आता तरं इंस्टाग्रामवर देखील अधिक लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर २० दशलक्षपेक्षा ही अधिक फॉलोवर्स असणारा शाहरुख स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी ८०लाख ते १ करोड इतके मानधन घेतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *