Headlines

बॉलिवूडच्या या अभिनेत्री वापरतात लोकांच्या कारच्या किमती एवढ्या पर्स, नंबर ५ वालीची पर्स तर आहे तब्बल ८.५ लाखाची !

पैसा असेल तर माणूस जगातील कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो. जगात असे बरेच लोक आहेत जे खूप मेहनतीने काटकसर करून पैसे गोळा करत असतात. तर याविरुद्ध असेही काही लोक आहेत जे बारीक-सारीक गोष्टींसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. यामध्ये बॉलिवूडच्या कलाकारांचे नाव अनेकदा अग्रस्थानी असते. बॉलीवूड इंडस्ट्री ही अनेकदा फॅशन आणि स्टाईल मुळे चर्चेत असते.

याशिवाय बॉलिवूड कलाकार त्यांच्या लक्झरी वस्तूंसाठी चर्चेत असतात. बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या छोट्या छोट्या वस्तूंसाठी लाखो करोडो रुपये खर्च करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्री आणि त्यांच्या महागड्या वस्तूं बद्दल सांगणार आहोत.

1. आलिया भट – बॉलिवूडची क्युट गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आलिया भट ने खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले. आलियाने करन जोहरच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करून भरपूर पैसा कमावला.
काही दिवसांपूर्वीच आलिया एअरपोर्टवर शनेलच्या लाल रंगाच्या टू साईड स्लिंग बॅग सोबत पाहिले गेले. त्यावेळी आलियाची ही अनोखी बॅग खूप चर्चेत आली होती. लैंबस्किंन पासून तयार झालेली रेड टोनची डबल बॅग खूप महागडी आहे. असे म्हटले जाते की या बॅगेची किंमत तब्बल ४,८२,५३४ रुपये इतकी आहे.

2. अनुष्का शर्मा – बॉलीवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला क्वीन ऑफ कॅज्युअल फॅशन असे म्हटले जाते. अनुष्काने शाहरुख खान सोबत २००८ मध्ये रबने बनादी जोडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिने बँड बाजा बरात, जब तक है जान, ये दिल हे मुश्किल यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले.
अनुष्का सुद्धा तिच्या महागड्या वस्तू साठी प्रसिद्ध आहे. अनुष्का कडे ब्लॅक लेदर फेंडी हॅन्ड बॅग आहे जी तिच्या कॅज्युअल फॅशनचा एक भाग असते. या बॅग ला मोनोग्राम टोट बॅग या नावाने ओळखले जाते. या बॅगेची किंमत साधारण दीड लाख रुपये इतकी आहे.

3. दीपिका पादुकोण – सध्याची बॉलिवुडची मेगास्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण ज्या चित्रपटांमध्ये काम करते तो चित्रपट सुपरहिट होतो. त्यामुळे तिची दिवसेंदिवस फी वाढत चालली आहे. दीपिकाला चित्रपटांमध्ये घेण्यासाठी चित्रपट निर्माते हवा तो आकडा देण्यास तयार असतात. एवढा पैसा कमावल्या नंतर दीपिकाचे राहणीमान सुद्धा तसे उंची झाले आहे. दीपिका पादुकोण कडे शनेल डबल एक्सेल फ्लॅप ची बॅग आहे.
या बॅगेचा आकार मोठा असून तिचा लुक सुद्धा खूप सुंदर आहे. दीपिका स्वतः या बॅगेला कॅरी करत नाही. या बॅगेला कॅरी करण्यासाठी तिने एक असिस्टंट ठेवला आहे. या बॅगेची किंमत ३.५ लाख रुपयांहून अधिक असल्याचे म्हटले जाते. या बॅगेच्या साईज मुळे ती ट्रॅव्हलिंग साठी उत्तम पर्याय आहे. काळ्या रंगाच्या या बॅगेवर सोनेरी रंगाची जड चैन लावली आहे.

4. सोनम कपूर – सोनम कपूरच्या बॅग कलेक्शनमध्ये डिऑर आणि एरमेज़ केली या बॅग्जचा समावेश आहे. मात्र सोनम कपूरला जास्त शनेल क्लासिक बॅग आवडते. या बॅगे ची किंमत ४ लाख रुपयांपर्यंत आहे. शनेल त्याच्या बॅगच्या लोकप्रियतेमुळे त्यांची किंमत वाढत असतो. ही बॅग १९५५ मध्ये खूप प्रसिद्ध झाली होती. आताच्या काळात तिची प्रसिद्धी अजून वाढली आहे. सध्या ही बॅग वेगवेगळ्या साईज व कलर्स मध्ये उपलब्ध आहे.
5. प्रियंका चोपडा – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा कडे शनेलची जेरी कैन प्लेक्सीग्लास मिनॉडियर आहे. या बॅगेची किंमत तब्बल ८.५ लाख रुपये आहे. प्रियांकाने ही बॅग स्ट्रीट स्टाईल फॅशन म्हणून वापरली होती.
6. करीना कपूर खान – बॉलिवूडची बेबो आणि पतौडी खानदानाची सून म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या बर्किन बॅग सोबत बऱ्याचदा दिसते. या ब्रँडची बॅग सहजासहजी मिळत नाही. या कंपनीचे काही नियम आहेत. ही बॅग घेण्यासाठी आधी बुकिंग करावी लागते. त्यानंतर कुठे ५/६ वर्षांनी आपला नंबर येतो.
बुकिंग करण्याआधी कंपनीद्वारे तुम्ही आधी कोणत्या ब्रँडची बॅग वापरायचा या सर्व गोष्टींची चौकशी केली जाते. तुमची प्रतिष्ठा पाहून तुम्हाला या ब्रॅंडची बुकिंग करायला मिळते. या बॅगेची किंमत तब्बल ९ लाख रुपये इतकी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !