या ५ अभिनेत्री आहेत सर्वात श्रीमंत व्यावसायिकांच्या पत्नी, नंबर ५ वाली तर आहे १९८८० करोडची मालकीण !

bollyreport
3 Min Read

श्रीमंत बनण्याची इच्छा सर्वांनाच असते. त्यामुळे प्रत्येक जण आपआपल्यापरीने श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये काही जणांना यश मिळते तर काहीजण अपयशी ठरतात. बॉलीवूडमध्ये श्रीमंत होण्यासाठी अनेक जण आपापले नशिबाचा होतात. तर काहीजण श्रीमंत होण्यासाठी लग्न करतात.

चित्रपट जाहिराती मार्फत भरपूर पैसा कमावणारे हे कलाकार उद्योगपती बरोबर लग्न करून गडगंज श्रीमंत होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या व्यावसायिकांसह लग्न करून भरपूर श्रीमंत झाल्या.

1. राणी मुखर्जी – एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी सध्याच्या काळात चित्रपटांमध्ये दिसते. एक काळ असा होता की राणीचे अनेक चित्रपट वर्षभरात प्रदर्शित व्हायचे. मात्र आता राणीचे फारसे चित्रपट येत नाही. यामागील कारण देखील तसेच आहे ते म्हणजे राणी आता तिच्या संसारात मग्न झाली आहे.
राणीने बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोपडा सोबत लग्न केले. आदित्य चोपडा हे भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट निर्माता कंपनी यशराज फिल्म चे मालक आहे. विकिपीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची ६३५० करोड रुपये संपत्ती आहे. राणी सर्वात शेवटी मर्दानी २ या चित्रपटात दिसली होती.
2. विद्या बालन – बॉलिवूडची सोज्ज्वळ अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या विद्या बालन ने चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय सोबत लग्न केले. सिद्धार्थ रॉय चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांची सुद्धा निर्मिती करतात.
सिद्धार्थ रॉय यांचे विद्या बालन शी झालेले तिसरे लग्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ रॉय सध्या ३३७२ करोडो रुपयांचे मालक आहेत.
3. शिल्पा शेट्टी – ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बिझनेसमन राजमुद्रा सोबत लग्न केले. राज कुंद्रा यांचे डेव्हलपर्स ग्रुप आणि टीएमटी ग्लोबल यांसारखे अनेक यशस्वी व्यवसाय आहेत.
राज कुंद्रा यांच्याकडे २८४० करोडो रुपयांची संपत्ती आहे.
4. असिन – गजनी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात राज्य केलेली अभिनेत्री असिन ने नंतर सलमान खान सोबत रेडी आणि अक्षय कुमार सोबत हाउसफुल ३ व अन्य चित्रपट केले.
असिनने बॉलिवूड सोबतच साउथ कडील चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. मात्र तिने जीवनसाथी म्हणून इंडस्ट्रीमधील अभिनेता नाही तर एका उद्योगपतीला निवडले. असिनने मायक्रोमॅक्स कंपनीचे कॉफौंडर राहुल शर्मा सोबत लग्न केले. त्यांना आता अरिन नावाची मुलगी आहे. राहुल शर्माकडे सध्या ७१५ करोडो रुपयांची संपत्ती आहे.
5. टीना अंबानी – ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री टिना मुनीमने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. त्याकाळी त्यांचे नाव काही अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते मात्र त्या सर्वांना डावलून टीना यांनी भारतातील सर्वात मोठे व्यापारी, उद्योजक अनिल अंबानी सोबत लग्न केले.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार टीना अंबानी आता १९८८० करोडो रुपयांच्या मालकिन आहेत. टीना यांनी देस परदेस, कर्ज, लुटमार, ये वादा रहा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे‌.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.