Headlines

फिल्म इंडस्ट्री मधल्या या भावा बहिणींच्या जोड्या, काही ठरले हिट तर काही फ्लॉप !

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या भावा बहिणीला बघून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. जेव्हा एकाच इंडस्ट्रीमध्ये परिवारातील दोन सदस्य काम करत असतील तेव्हा त्यांच्यात तुलना होणे हे सहाजिकच आहे. इंडस्ट्रीमध्ये असे फारच कमी वेळा झाले आहे की भावा बहीण दोघांनाही सफलता मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच भावाबहिणींची जोडी दाखवणार आहोत ज्यांच्यात इंडस्ट्रीमध्ये एक हिट ठरला तर दुसरा फ्लॉप.
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी –
१९९३ मध्ये आलेल्या बाजीगर चित्रपटातून शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटातील तिचा रोल साठी तिला फिल्मफेअर चे बेस्ट सपोर्टिंग रोल अवॉर्डने गौरविण्यात आले होते. या चित्रपटानंतर शिल्पाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट केले. तर शमिता शेट्टी म्हणजेच शिल्पा शेट्टीची छोटी बहीण आहे.
हिने २००० साली मल्टीस्टार असलेला चित्रपट मोहब्बते मधून पदार्पण केले होते. हा चित्रपट खूप हिट झाला. त्यानंतर तिने अनेक मल्टीस्टारवाल्या चित्रपटात काम केले. पण तिच्या अभिनयाला मात्र शिल्पा शेट्टी इतका वाव मिळाला नाही.
काजोल आणि तनिशा मुखर्जी
बॉलिवुड मध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी काजोल हिने १९९२ मध्ये आलेल्या बेखुदी या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काजलच्या अभिनय कौशल्यामुळे तिला अनेक हिट चित्रपट करण्याची संधी मिळाली.
तिच्या बहिणी बद्दल बोलायचे झाल्यास तनिशा मुखर्जीने २००५ मध्ये आलेल्या नील अँड निकी या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर सुद्धा तनिषा अनेक चित्रपटात दिसली होती. मात्र तिच्या हाती काजोल सारखे यश आले नाही.
मलाइका अरोरा आणि अमृता अरोरा –
मलाइका अरोरा ने अनेक जाहिराती आणि म्युझिक अल्बम मदन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे ती तिच्या चित्रपटांसाठी तितकीशी प्रसिद्ध झाली नाही पण तिने केलेले आइटम सॉन्ग खूप गाजले.
मलायका ची बहिण अमृता अरोराने २००० मध्ये आलेल्या कितने पास कितने दूर या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण तिला फारशी ओळख मिळाली नाही.
सलमान खान आणि सोहेल खान
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानने १९८८ मध्ये आलेल्या बिवी हो तो ऐसी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सलमान खानने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर १९८९ मध्ये सलमान खानने मैने प्यार किया हा चित्रपट केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला.
यानंतर सलमान खानला खूप प्रसिद्धी मिळत गेली. सलमान खानचा भाऊ सोहेल खानने सुध्दा अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे मात्र त्याला फारशी प्रसिध्दी मिळाली नाही.
सनी देओल आणि बॉबी देओल –
सनी देओल ने त्याचा भाऊ बॉबी देओल च्या आधी बॉलिवुड मध्ये पदार्पण केले होते. सनी देओल च्या दमदार आवाजाचा आणि अभिनयाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यानंतर बॉबी ने सुद्धा इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकले, करीयर च्या सुरुवातीच्या दिवसांत बॉबी ला खूप प्रसिद्धी मिळाली पण नंतर त्याच्या करियरची गाडी भरकटत गेली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *