स्टार प्लसच्या या बालकलाकार आता झाल्या आहेत एवढ्या मोठ्या, एक आहे साऊथची मोठी हिरोईन !

1406

१) ऋचा भद्रा –
स्टार प्लस वरील लोकप्रिय मालिका खिचडी मध्ये चक्की पारेख ची भूमिका साकारणारी बालकलाकार ऋचा भद्रा आता खूप बदलली आहे. आता ती ३१ वर्षांची झाली आहे. ऋचा ने २०१७ मध्ये बिझनेस मॅन सोबत लग्न केले आणि टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
२) स्विनि खारा –
२००५ मध्ये स्टार प्लस वरील प्रसिद्ध मालिका बा बहू और बेबी मध्ये चैताली ठक्कर ही भुमिका साकारणारी बालकलाकार स्विनी खारा आता एकवीस वर्षांची झाली आहे. टीव्हीवरील मालिकांव्यतिरिक्त स्विनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा दिसली होती. सर्वात शेवटी ती एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटांमध्ये दिसली होती.

हे वाचा – कधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता लॉक डाउनमध्ये घरात बसून करत आहे हे काम !३) खुशी दुबे –
खुशी दुबे ही अभिनेत्री सुद्धा स्टार प्लस वरील बा बहू और बेबी या मालिकेत सिमरन तुषार भयानी या रोल मध्ये दिसली होती आता ती वीस वर्षांची आहे. खुशी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते.
४) तन्वी हेगडे –
त्यावेळची विशेषता लहान मुलांची सर्वात आवडती मालिका सोनपरी मध्ये तन्वी हेगडे फ्रुटी या रोलमध्ये दिसली होती. तन्वीला फ्रुटी या भूमिकेने खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती. आता ती अठ्ठावीस वर्षांची असून मराठी चित्रपटांमध्ये खूप सक्रिय असते.

हे वाचा – एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !५) श्रेया शर्मा –
स्टार प्लस वरील २००१ मधील प्रसिद्ध मालिका कसोटी जिंदगी की या मालिकेत स्नेहा हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्रेया शर्मा आता एकवीस वर्षांची झाली आहे. श्रेया आता तेलगू चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम सुद्धा केले आहे.
६) रूहानिका धवन –
स्टार प्लस वरील खूप प्रसिद्धी लाभलेला ये है मोहब्बते या मालिकेत रूही या छोट्या मुलीचे पात्र रंगवणारी प्रसिद्ध बालकलाकार रूहानिका धवन आता खूप बदलली आहे. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षात तिने खूप लोकप्रियता मिळवली होती.

हे वाचा – सलमान खान यांच्या वडिलांवर लॉकडाऊन मोडल्याचा ठपका, पण मिळालं हे उत्तर !७) हंसिका मोटवानी –
हंसिका मोटवानी ने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. २००० मध्ये तिच्या करिअरच्या सुरुवातीला ती ‘शका लाका बुम बुम’ या लहान मुलांच्या लोकप्रिय मालिकेत दिसली होती. यामध्ये तिने करूणा हे पात्र साकारले होते. आता ते साऊथ कडील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

हे वाचा – मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !