Headlines

46 अनाथाश्रम, 19 गोशाळा, 26 मोफत शाळा आणि 16 वृद्धाश्रम, दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या बद्दल माहित नसलेल्या गोष्टी !

कर्म ही अशी एक गोष्ट आहे, जी प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी ओळख दाखवत असते. आपण जसे कार्य करतो तसे आपल्याला फळ ही मिळत असते, म्हणूनच व्यक्ती हा फक्त नावाने प्रसिद्ध तर तो त्याच्या कर्मामुळे देखील ओळखला जातो, याला बॉलीवूड क्षेत्रफळ नाही. बॉलिवूड क्षेत्रामध्ये असे अनेक दिग्गज आहेत जे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडत तर असतात पण त्याचबरोबर समाजकार्याच्या माध्यमातून देखील स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण करत असतात.

समाजाशी असलेली आपली बांधिलकी जपत असतात. चांगल्या कार्याच्या ओळखीमुळे हे लोक ज्या माणसांमध्ये आपले वेगळे करून कर्तुत्व निर्माण करतात. कन्नड चित्रपट इंडस्ट्रीचे सुपरस्टार पुनीत राज कुमार यांचे नुकतेच निधन झाले. या अभिनेत्याचे नाव सर्व चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अगदी मानाने घेतले जायचे.

हार्ट अटॅक मुळे पुनीत यांचे निधन झाले. अचानक झालेल्या या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अचानक झालेल्या या निधनामुळे बॉलीवूड क्षेत्रावर शोक कळा तर पसरली पण त्याच बरोबर अनेकांचे व्यक्तिगत नुकसान देखील झाले तसेच चहात्यांना दुःख देखील झाले.

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकपूर आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी आपल्या कार्या मुळे अनेकांच्या मनात राहतील असे कार्य देखील केलेले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी अभिनेता पुनीत यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या अनेक चांगल्या आठवणी मागे राहिलेल्या आहेत.

पुनीत राज कुमार इंडस्ट्री मधील ज्या अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एक स्वतंत्र अशी ओळखता निर्माण केली आहे परंतु सामाजिक कार्यामध्ये स्वतःचे आयुष्य वेचलेले आहे. पुनीत यांनी आपल्या उभ्या जीवनामध्ये अनेक समाजकार्य केले आणि म्हणूनच तळागाळातील लोकांना पुनीत यांचा मोठा आधार लाभला. आपल्या आवडत्या अभिनेत्याची मृत्यूची बातमी ऐकताच चाहता वर्ग भावूक झाला. त्यांच्या अंतिम दर्शनाला लाखो पेक्षा जास्त लोक आले होते. अभिनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यावर्गांमध्ये जबरदस्त निराशा पसरली.

काही चाहत्या वर्गांना हार्ट अटॅक देखील आला. पुनीत यांच्या सामाजिक कार्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या स्तरावर कार्य केले आहे. पुनीत स्वतः 46 आश्रम, 19 गोशाळा 26 मोफत शाळा व 16 वृद्धाश्रम चालवत असे. पुनीत यांच्या अफाट समाजकार्यामुळे समाजाचा आधार गमावला आहे, असा देखील सूर चहात्या वर्गाकडून ऐकायला मिळत आहे.

पुनीत यांनी निधनापूर्वी स्वतःचे डोळे देखील दान करण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच अभिनेत्याच्या निधनानंतर त्यांचे डोळे गरजूला दान करण्यात आले. जिवंत असताना अभिनेता पुनीत यांनी अफाट समाज कार्यामुळे अनेकांच्या मनात जागा निर्माण केली परंतु निधनानंतर देखील केलेल्या समाजकार्यामुळे पुणे अनेकांच्या हृदयामध्ये नेहमी जिवंत राहतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. ” मरावे परी कीर्ती उरावी” असे त्यांचे जीवन नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहील.