Headlines

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर महिलेचा खळबळजनक खुलासा, 15 कोटी वाचविण्यासाठी व्यवसायिकाने केली ह*त्या !

दोन दिवसापूर्वीच अभिनेता सतीश कौशिक यांचे निधन झाले. निधन जरी हृदयविकाराने झाले असले तरी आता एक नवीनच बातमी सगळ्यांसमोर आलेली आहे आणि ही बातमी खळबर्जनक परिस्थिती निर्माण करणारी आहे. दिल्लीमधील एका व्यावसायिकाच्या पत्नीने हा दावा केलेला आहे. तिने म्हटले आहे की, तिच्या पतीने दुबई येथे गुंतवणुकीसाठी अभिनेता सतीश कौशिक कडून 15 कोटी रुपये घेतले होते. यापूर्वी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या फार्महाउस मध्ये सतीश कौशिक यांची होळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणाहून काही औषधे देखील सापडले आहेत.

दिल्लीमधील एका व्यवसायिकाच्या पत्नीने अभिनेता सतीश कौशिक यांच्या निधनाला हत्या म्हटले आहे. तिने म्हटले आहे की,सतीश कौशिक यांचे नैसर्गिक हृदयविकाराने निधन अजिबात झाले नाहीये.. त्यांचा कोणीतरी मृत्यू घडवून आणलेला आहे!. या विधानानंतर बॉलीवूड क्षेत्रामध्ये एकच खळबळ माजली आहे. अनेकांच्या नजरा उंचावल्या आहेत.

व्यवसायिकाच्या पत्नीने दिल्ली पोलिसाला दिलेल्या तक्रारीमध्ये असा दावा केला आहे की, तिच्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते. जे पैसे माझ्या पतीला परत करायचे नव्हते. सतीश कौशिक वारंवार या व्यवसायिककडून 15 कोटी रुपये मागत होते. व्यवसायिक पत्नीचे असे देखील म्हणणे आहे की, तिच्या पतीने काही औषधांच्या मदतीने सतीश कौशिक यांची हत्या केली आहे. सतीश कौशिक यांचे निधन होळीच्या रात्री झाले. सतीश कौशिक यांना श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत होता परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच कार मध्ये त्यांचे निधन झाले.

दिल्लीमधील व्यवसायिकाच्या पत्नीच्या मते, तिच्या नवऱ्याने दुबईमध्ये गुंतवणुकीसाठी सतीश कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते. यापूर्वी दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या ठिकाणी होळीचे सेलिब्रेशन होत होते त्या ठिकाणी काही संशयापद घटनादेखील घडलेल्या आहेत. तसेच त्यांना या ठिकाणी औषधांचे पॅकेट सापडले आहेत. या सर्व परिस्थितीची तपासणी दिल्ली पोलीस अधिकारी करत आहेत आणि योग्य तो छडा लावण्याचा निर्धार देखील त्यांनी केलेला आहे, म्हणूनच एकंदरीत घडलेली घटना भयंकर असून आता सर्व चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारी आहे.

सतीश आणि व्यवसायिक यांच्यामध्ये गेले अनेक दिवसांपासून वाद देखील झाला होता. पैसे परत न करत असल्याने सतीश वारंवार फोन करत असायचे परंतु आपली फसगत झालेली आहे अशी भावना अभिनेता सतीश यांना जाणवत होती आणि याची जाणीव देखील झाली होती म्हणूनच आपले दिलेले पंधरा कोटी परत मिळावे यासाठी सतीश व्यवसायिकाला वारंवार कॉल करत असे, अशी माहिती व्यवसायिकाच्या पत्नीने पोलिसांना दिली.. 24 ऑगस्ट 2022 रोजी दोघांमध्ये वाद ही झाला हा वाद एकदमच टोकाला देखील गेला होता.

न्यूज एजन्सी आय ए एन एस आर च्या म्हणण्यानुसार महिलेने व्यवसायिका सोबत 13 मार्च 2019 ला लग्न केले होते. यावेळी सतीश कौशिक यांची भेट व्यावसायिकाने घडवून दिली होती. सतीश कौशिक व्यवसायाच्या निमित्ताने भेटण्यासाठी माझ्या पतीला दुबई येथे देखील भेटायला येत असे. या सर्व गोष्टी महिला ने पोलिसांना दिलेल्या तक्रारी पत्रामध्ये सांगितले आहेत. असे म्हटले जात आहे की, 23 ऑगस्ट 2022 रोजी ला सतीश कौशिक दुबईला गेले होते, तेव्हा आपल्या पतीकडून 15 कोटी रुपयांची मागणी देखील केली होती, यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात बिघडली. माझ्या पतीचे म्हणणे होते की ते लवकरच घेतलेले पैसे परत करून देईल परंतु सतीश ऐकायला तयार नव्हते…

महिलेच्या सांगण्यानुसार व्यावसायिक पैसे परत करण्यासाठी आवश्यक तो वेळ देखील घेतला होता आणि दिलेल्या वेळामध्ये सतीश कौशिक यांना त्यांचे पैसे परत करणार होता. आता सतीश कौशिक यांचे निधन झाल्यामुळे या महिलेला संशय येत आहे की, सतीश कौशिक यांचे निधन नाही तर अपघाती निधन झालेले आहे म्हणजेच हत्या केलेली आहे असा दावा देखील त्यांनी या मृत्यू तक्रार पत्र मध्ये केला आहे. तिच्याच नवऱ्याने एकंदरीत प्लॅन आखून आपले पैसे वाचवण्यासाठी ही घटना घडवून आणली आहे, असा संशय देखील या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे.

हे तक्रार पत्र या महिलेने दिल्ली पोलिसांना सादर केलेले आहे. ही माहिती मिळत असलेली पोलीस आता पुढील तपासणीसाठी पुढे आलेले आहेत आणि या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी जे लोक उपस्थित होते, त्यांची चौकशी देखील करायला सुरुवात केली आहे. एकंदरीत या दाव्यामुळे बॉलीवूडमुळे खळबळ माजली आहे.