Headlines

अडचणीच्या वेळी क्रिकेटर सूर्या कुमार यादवला दिली पत्नीने साथ, गंभीर परिस्थितीत राहिली पाठीशी खंबीर !

मानवी जीवनामध्ये कधी कोणती परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना करता येत नाही. सुखाचे दिवस कधी दुःखाचे बदलून जातील याचा अंदाज देखील येत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संकट येते तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला कमीच पाहायला मिळतात. या लोकांमुळे आपल्याला संकटावर मात करण्याची शक्ती प्रेरणा मिळत असते.

या व्यक्तीच्या आधाराने आपण सकारात्मक विचार करू शकतो आणि सकारात्मक दृष्टीने जीवन जगण्याचा प्रयत्न देखील करत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका क्रिकेटर बद्दल सांगणार आहोत, ज्या क्रिकेटच्या जीवनामध्ये एक काळ दुःखाचा होता परंतु त्याच्या पत्नीने त्याला दिलेली साथ अतिशय मोलाची ठरली म्हणूनच दुःखावर मात करण्यासाठी त्याला मदत मिळाली.

आपण ज्या क्रिकेटर बद्दल जाणून घेत आहोत त्या क्रिकेटर चे नाव आहे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मानला जातो. त्यानेचआतापर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर टीम इंडिया मध्ये महत्त्वाचे पद प्राप्त केलेले आहे. काही दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादव ने एक वक्तव्य केले होते, या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर रंगत आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा सूर्य कुमार चर्चेचा विषय बनलेला आहे.

सूर्या कुमार यादवने असे म्हटले होते की, त्यांच्या पत्नीने त्याचे करिअर बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याचबरोबर सूर्यकुमार यादवाच्या प्रत्येक करिअरमध्ये त्याची पत्नी ने जे सहकार्य केलेले आहे त्याचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. प्रत्येक पावलावर माझ्या पत्नीने माझी साथ सोडली नाही. मी जेव्हा करिअरमध्ये अयशस्वी होत होतो तेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मला धीर दिला! आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याचे सर्वस्वी श्रेय माझ्या पत्नीला जाते, असे देखील सूर्यकुमार यादव म्हणाला!

एक वेळ असा होता की सूर्यकुमार यादव टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी तरसत होता, त्याचे एक एक साथीदार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आपले स्वतःचे स्थान बनवत होते.. त्यावेळी सूर्या फक्त घरगुती क्रिकेट आणि आयपीएल पर्यंतच मर्यादित होता. सूर्यकुमार यादवला डोमेस्टिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत पोहोचण्यासाठी एकंदरी दहा वर्षाचा काळ लागला. या दहा वर्षाच्या काळामध्ये त्याच्या पत्नीने खूप धीर दिला आणि संयम देखील राखला.

सूर्यकुमार यादव च्या पत्नीचे नाव देवीशा आहे. देवीशाने आतापर्यंत माझ्या प्रत्येक करिअरच्या वाटेवर मला साथ दिलेली आहे. आज मी भरारी घेतलेली आहे त्यास भरारीचे सर्वस्वी श्रेय माझ्या पत्नीला जाते. माझ्या पत्नीने व्यक्तिगत कोच बनवून माझ्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि यामुळेच मी भारतीय टीम मध्ये माझे स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण करू शकलो, असे देखील सूर्यकुमार यादवने माध्यमांना दिलेल्या वक्तव्यांमध्ये सांगितले.

एका मुलाखतीच्या दरम्यान सूर्यकुमार यादवने असे म्हटले होते की, मला आताही आठवतं जेव्हा मी अंडर 23 मध्ये खेळत होतो. माझ्यासोबत अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि के एल राहुल होते. हे सारे लोक माझ्यासोबत एकेकाळी खेळले होते. ही सारी मंडळी वर्ष 2015 16 पर्यंत भारतीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळत होते, यानंतर या सर्व विषयांवर माझी आणि माझ्या पत्नीची नेहमी चर्चा होत असे यानंतर मी गेल्या अनेक वर्षाचा आलेख डोळ्यांसमोर मांडला.

आतापर्यंत मी काय काय कामगिरी केली आहे आणि मला पुढे नेमकी काय कामगिरी करायची आहे याचा एक प्लॅन देखील आखला आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला.. पुढे वाटचाल करत असताना माझ्या पत्नीने मला अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. एखाद्या कोच प्रमाणे ती मला मार्गदर्शन करू लागली म्हणूनच आज जे मला यश मिळालेले आहे, ते सारे यश माझ्या पत्नीमुळे मिळालेले आहे… असे मला सांगताना अभिमान आणि गर्व वाटत आहे!!..