Headlines

मृत्यूनंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आपल्या कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली तब्बल एवढी संपत्ती !

कॉमेडीकिंग अशी ओळख असलेल्या राजू श्रीवास्तव यांचे बुधवार 21 सप्टेंबर 2020 ला सकाळी निधन झाले. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेले 40 दिवस ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. 10 ऑगस्टला रात्री जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.

त्यानंतर तब्बल 33 दिवस ते कोमात होते. आपल्या विनोदांनी सर्वांना खळखळून हसवणाऱ्या राजू यांनी करोडो रुपयांची संपत्ती आपल्या पाठी ठेवली आहे.

राजू यांच्या पाठी त्यांचा भाऊ दिपू श्रीवास्तव, पत्नी शिखा श्रीवास्तव व दोन मुले आयुष्मान आणि अंतरा श्रीवास्तव हे आहेत.
राजू यांचा जन्म कानपूरमध्ये झाला होता. पुढे बॉलिवूडमध्ये काम करायचे म्हणून ते मुंबईत आले. त्यांनी त्यांच्या अभिनयातल्या करीअरची सुरुवात 1988 मध्ये आलेल्या तेजाब या चित्रपटातून केली.

त्यानंतर त्यांनी मैने प्यार किया, बाजीगर, आमदानी अठ्ठानी खर्चा रुपया, बिग ब्रदर, बॉम्बे टू गोवा यांसारख्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव हे सर्व सामान्य माणसाचे आयुष्य जगायचे. पण त्याच्याकडे बक्कळ संपत्ती होती. त्यांच्याकडे एक इनोवा, 82.48 लाखांची ऑडी क्यू7 , 46.86 लाखांची बीएमडब्ल्यू 3 सीरीज अशा महागड्या गाड्या होत्या.

त्यांचे नेटवर्थ हे 15 ते 20 कोटींदरम्यान होते. तसेच ते सूत्रसंचालन, जाहिराती, रिअॅलिटी शो, आणि स्टेज शो करण्यासाठी खूप पैसे घ्यायचे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की ते लाखो रुपये चार्ज करतात. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आजही त्यांचे एक घर आहे. जिथे त्यांचा परिवार राहतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !