Headlines

मलायकाचा १७ वर्षाचा मुलगा ‘अरहान’ला काय वाटते मलायका आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल, मलायकाने स्वतःच सांगितले !

बॉलीवूडमधील कलाकारांचे अफेयर्स, लग्न, त्यांचे सिनेमा व इतर खाजगी गोष्टी यावरून त्यांच्या संबंधित अनेक बातम्या, अफवा या पसरत असतात. काही जण हे आपलं बर्‍याच गोष्टी लोकांपासून लपवत असतात आणि मग त्या लपलेल्या गोष्टी समोर आला की मोठी बातमी होते. काही कलाकारांनी तर लग्न केल्यावर आपले फोटो सोशल मीडियावर शेयर केले. काही कलाकारांचे पार्टनर हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असल्याने सोशल मीडियावर ते ट्रोल होतात.

असच एक बॉलीवुडमधील प्रसिद्ध जोडपं म्हणजे मलाईका अरोडा व अर्जुन कपूर. सुरूवातीला हे दोघे ही आपलं नातं सर्वांपासून लपवत होते. पण हळू हळू यांचं नातं सर्वांसमोर आलं. मलाईका अर्जुनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. एप्रिल, मे २०२० मध्ये दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत होती, पण सध्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

काही कालावधीपूर्वी मलाईकाने अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबाबत आणि मुलाबाबत एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली, येत्या वेळेनुसार आम्ही एकेक पाऊल पुढे टाकू, लग्नाबाबत आम्ही आताच काही सांगू शकत नाही. आम्ही दोघे ही आमच्या नात्याबाबत फारच इमानदार आहोत. गोष्टी जशा पुढे जातील, त्याबद्दल आम्ही माहिती देऊ. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या ही कुटुंबांनी यांच्या नात्याला हिरवा कंदील दिला आहे.

दोघांना ही अनेकदा फॅमिली फंक्शन, डिनर, लंचसाठी एकत्र दिसत आहेत. इतकंच नव्हे तर मलाईकाचा १७ वर्षांचा मुलगा अरहानने देखील अर्जुन व मलाईकाचे नाते कबूल केले आहे. अर्जुन व अरहानमध्ये खूप चांगली बॉंडिंग देखील झाली आहे.

मुलाखतीमध्ये मलाईकाला विचारले की, तिच्या व अर्जुनच्या नात्यावर तिचा मुलगा अरहानची काय प्रतिक्रिया होती, तेव्हा ती म्हणाली, आपल्या जवळच्या लोकांना आपल्या आयुष्यात काय सुरू आहे हे सांगणं फार गरजेचं असतं आणि त्यानंतर त्या गोष्टी समजून घ्यायला त्यांना वेळ दिला पाहिजे. अरहानमध्ये आणि आमच्यामध्येदेखील असच बोलणं झालं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पूर्वीपेक्षा आम्ही सगळे आता खुश आहोत.

अर्जुन कपूर ने मलाईका सोबतच्या लग्नाबाबत बोलतांना संगितले की, जेव्हा आम्ही लग्न करू तेव्हा ते लपून छपून करणार नाही. आम्ही तुम्हा सर्वांना सांगून विवाह करू. सध्या आमच लग्न करण्याचा कोणताही निर्णय नाही. २०१९ मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवसा दिवशी मलाईकाने तिच्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल सर्वांना संगितले होते. यानंतर या दोघांना ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अर्जुन आणि मलाईकाच्या नात्यामध्ये खूप अंतर आहे, त्यामुळे यांना ट्रोल केले जात आहे. परंतु यामुळे दोघांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही.

२०१९ मध्ये नेहा धुपियाच्या शो मध्ये मलाईकाने तिच्या व अर्जुनच्या लग्नाचा प्लॅन सांगताना ती म्हणाली, ‘आमची व्हाईट वेडिंग सेरेमनी म्हणजेच ख्रिश्चन पद्धतीने लग्न बीचवर होईल. मला ब्राईडमैड्स हा प्रकार फार आवडतो. माझ्या जवळच्या मैत्रिणी माझ्या ब्राईडमैड्स असतील.’ मलाईकाच्या मते, अर्जुन तिच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

दोघे खूप काळापासून एकमेकांना डेट करत होते आणि वर्षभरातचं त्यांनी आपल्या नात्याविषयी सर्वांना संगितले. अरबाज खानसोबत मलाईकाने २०१७ मध्ये घ*ट*स्फो*ट घेतला. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली, मला वाटतं की, सर्वांना आपल्या जीवनात घडलेल्या घटनांना मागे टाकून पुढे जाण्याचा अधिकार आहे. आणि जे आपल्याशी जोडले आहेत त्यांचे प्रेम आणि सोबत हवी असते. आपण देखील असं करत आहात तर तुम्ही नशीबवान आहात आणि तुमचे नशीब पुन्हा तुम्हाला सुखी व आनंदी राहण्याची संधी देत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !