या कारणामुळे ‘आमिर खान’ कधीच जात नाहीत कपिल शर्माच्या शो मध्ये चित्रपट प्रमोशनसाठी !

70521

कपिल शर्मा चा लोकप्रिय शोमध्ये बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.‌ प्रत्येक कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा शो मध्ये येत असतात. महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांसारखे अनेक मोठमोठे कलाकार या शोमध्ये येऊन गेले आहेत. मात्र आमिर खान आजपर्यंत या शोमध्ये कधीच गेलेला नाही. असे म्हटले जाते की अमीर खानला या शोमध्ये बोलावण्याचा कपिल शर्माने खूप प्रयत्न केला.

कपिल शर्माचा शो दरम्यान आमिर खान चे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र आमिर खानने कधीच कपिल शर्माचा शो मध्ये जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले नाही. अमीर च्या मते त्याच्या चित्रपटाला कोणत्याच प्रमोशनची गरज नाही त्यामुळे तो कपिल शर्मा टीव्ही शो मध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करत नाही. आमिर खानची प्रमोशन करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या प्रत्येक वेळी आमिर खान एक नवी कल्पना करून त्या प्रकारे त्या चित्रपटाचे प्रमोशन करतो.

एका रिपोर्टनुसार आमिर खानला कपिल शर्मा शो आवडत नाही. या शोमध्ये कपिल शर्मा अनेकदा महिलांवर जोक्स करतो. स्टार्स ला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतो. या शोमध्ये अनेकदा अनेक कलाकारांचा अपमान सुद्धा झाला आहे. हे सर्व असून सुद्धा फक्त निर्मात्यांच्या सांगण्यावरून ते या शोमध्ये जातात. मात्र आमिर खान ला हे बिलकुल मंजूर नाही त्यामुळे तो कधीच या शोमध्ये गेलेला नाही.

कपिल शर्माचा शो मध्ये इंडस्ट्री पासून ते खेळ आणि राजकारणातील अनेक मोठमोठ्या व्यक्ती या शोमध्ये पाहुणे म्हणून येतात. अनेक कलाकार तर त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या शोला अधिक पसंती देतात. कपिल शर्माच्या या शोची फक्त भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा खूप फॅन फॉलोविंग आहे. देशातील तरुणांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत कपिला खूप पसंत केले जाते. हे प्रेक्षक कधीच कपिल शर्मा शो चा एक एपिसोड सुद्धा चुकवत नाहीत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !