दिलीप कुमार यांनी मृत्यूनंतर तब्बल एवढ्या करोड रूपयांची संपत्ती पाठीमागे सोडली, जाणून चकित व्हाल !

bollyreport
4 Min Read

गेल्या दोन वर्षात बॉलिवुडने कधीही ज्यांची पोकळी भरुन निघणार नाही असे दिग्गज कलाकार गमावले आहेत. आता या यादीत आणखी एका सुप्रसिद्ध कलाकाराचे नाव सहभागी झाले ते म्हणजे दिलीप कुमार ! बॉलिवुडचे एकेकाळचे सुपरस्टार दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेला काही काळ ते मृत्य़ूशी झुंज देत होते. मात्र बुधवार दिनांक ७ जुलैला सकाळी त्यांची ही झंज अपयशी ठरली. काही दिवसांपुर्वीच त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात भरती केले होते. दिलीप कुमार यांच्या अशा एक्झिटमुळे संपुर्ण इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने स्वत:ची वेगळी जागा निर्माण करणारे दिलीप कुमार ९६ वर्षांचे आहेत. ह्या ११ डिसेंबरला ते ९८ व्या वर्षांत पदार्पण झाले. दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होता. त्यांचे मुळ नाव मोहम्मद युसुफ खान असे होते. मात्र अभिनेत्री देविका राणीने त्यांचे युसुफ खान हे नाव बदलुन दिलीप कुमार असे ठेवले.

दिलीप कुमार यांच्या वडीलांचे नाव लाला गुलाम सरवर असे होते. त्यांनी त्यावेळी फळे विकुन घर सांभाळले होते. दिलीप कुमार यांना १२ बहिणभाऊ आहेत. त्यामुळे घर चालवण्यास त्यावेळी अनेक अडचणी यायच्या. फाळणीनंतर त्यांचा संपुर्ण मुंबईत राहण्यास आला. करोडो रुपयांचे मालक असलेल्या दिलीप कुमार यांची एकेकाळची संपत्ती केवळ ३६ रुपये होती. त्यानंतर स्वबळावर मेहनत करुन त्यांनी इंडस्ट्रीमध्ये भक्कम स्थान मिळवले. आता त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. सध्या त्यांच्याकडे ६०४ करोड ६३ लाखांहुन अधिक संपत्ती आहे.

दिलीप कुमार यांनी १९४४ मध्ये ‘ज्वारा भाटा’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले . त्याकाळी हा चित्रपट भरपूर सुपरहिट ठरला. त्यानंतर १९४७ मध्ये त्यांचा ‘जुगनु’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर त्यांच्याकडे अनेक मोठमोठे प्रोजेक्ट येत गेले. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये जुगनु, शहिद, अंदाज, जोगन, दाग, आन, देवदास, नया दौर, मुगल-ए-आजम यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. दिलीप कुमार त्यांच्या कामाच्या बाबतीत भरपूर गंभीर असायचे. यामुळेच वयाच्या अगदी २५ व्या वर्षी ते देशातील पहिल्या क्रमांकाचे अभिनेते म्हणुन ओळखले जायचे.

दिलीप कुमार यांना ८ फिल्म फेअर पुरस्कार मिळाले. तर १९ वेळा त्यांना फेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. याव्यतिरीक्त त्यांना दादा साहेब फाळके पुरस्कार, पद्मभुषण पुरस्कार सुद्धा मिळाले होते. तसेच त्यांना पाकिस्तानातील सर्वाच्च नागरिक पुरस्कार सुद्धा मिळाला होता. १९६६ मध्ये त्यांनी सायरा बानो सोबत लग्न केले. त्यावेळी दिलीप कुमार यांचे वय ४४ होते तर सायरा बानो २२ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये आसमा नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले.
मात्र हे त्यांचे हे लग्न अधिक काळ टिकु शकले नाही.

दिलीप कुमार यांचे मधुबाला सोबत असलेल्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यांच्या घरातुन त्यांच्या नात्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. दिलीप कुमार आणि मधुबालाची ओळख १९५१ मध्ये तराना या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दिलीप कुमार यांना मधुबालाशी लग्न करायचे होते मात्र मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना दिलीपकुमार बिलकुल आवडायचे नाही.

असे म्हटले जाते की, बी आर चोपडा यांच्या चित्रपटाच्या शुटींगसाठी मधुबाला आणि दिलीप कुमार यांना मध्यप्रदेशात जायचे होते मात्र मधुबालाच्या वडिलांनी त्यांना एकत्र जाण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे मधुबालाने शुटींगसाठी नकार दिला. या गोष्टीवर नाराज होऊन बी आऱ चोपडा यांनी अॅग्रीमेंटच्या आधारे तिच्यावर केस केली. या केसमध्ये दिलीप कुमार यांनी मधुबाला विरोधात साक्ष दिली होती. जर शेवटच्या क्षणी बी आर चोपडा यांनी जर केस मागे घेतली नसती तर मधुबालाला जेल मध्ये जावे लागले असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.