Headlines

सलमान खानवर प्रसिद्ध अभिनेत्रीचे गंभीर आरोप म्हणाली १६व्या वर्षीच मला त्याने … !

बॉलिवूडमधील मोस्ट बॅचलर मुंडा म्हणून अभिनेता सलमान खानला ओळखले जाते. पण असे असले तरी त्याच्या गर्लफ्रेंडची यादी भली मोठी आहे. अभिनेत्याने आतापर्यंत कतरीना कैफ, ऐश्वर्या राय यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींना डेट केले आहे. त्यातीलच एक असलेल्या सोमी अलीने सलमान खानवर भयनाक आरोप केले आहेत. सोमीने सलमान विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. नंतर तिने ही पोस्ट डिलीट केली. मात्र तोपर्यंत ही पोस्ट व्हायरल झाली होती.

सोमी अलीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये तिने सलमानचे नाव घेतले नसले तरी, तिने सलमानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे आणि ज्या प्रकाराने तिने लिहिले आहे त्यावरून हे स्पष्ट होते की तिचे लक्ष्य सलमान खान आहे.

सोमीने सलमानसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला. यामध्ये सलमान तिला गुलाबाचं फूल देताना दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, आता बरंच काही घडणार आहे. माझ्या शोला भारतात बंदी आणली आणि मला धमकावलं. तू भित्रा आहेस. इथे माझ्या सुरक्षेसाठी ५० वकील उभे आहेत, जे मला सिगारेटच्या चटक्यांपासून आणि शारीरिक शोषणापासून वाचवतील. हेच तू माझ्यासोबत बरीच वर्षे करत होतास.

त्या सर्व अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे, ज्या महिलांना मारहाण करणाऱ्या या व्यक्तीची साथ देतात. अशा अभिनेत्यांनाही लाज वाटली पाहिजे, ज्यांनी त्याची साथ दिली. आता लढण्याची वेळ आली आहे, असं धक्कादायक विधान तिने या पोस्टमध्ये केलं आहे.

सोमी अलीने ही पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होऊ लागली, मात्र काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली. सोमी अलीने असे का केले याचे कारण स्पष्ट झालेले नाही. एक काळ असा होता की सोमी अली आणि सलमान खान खूप जवळ होते.

त्यांच्या अफेअरच्या बातम्या सतत चर्चेत राहायच्या, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले, ब्रेकअपचे कारण सांगताना सोमी अलीने सलमानने तिची फसवणूक केल्याचे सांगितले. यानंतर अनेकवेळा सोमी अलीने सलमानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

1990 मध्ये सोमी वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली होती. सलमान आणि ती बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांच्यात काहीतरी बिनसले आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !