Headlines

कलाकारांनी चित्रपटात वापरलेल्या कपड्यांचे पुढे काय होते, जाणून थक्क व्हाल !

बॉलीवूड चित्रपटातील फिल्मी कलाकारांचा प्रभाव हा नेहमी भारतीय प्रेक्षकांवर झालेला दिसतो. लोक नेहमी त्यांच्या आवडता कलाकारांच्या स्टाईलचे अनुकरण करत असतात. प्रत्येक काळात जो अभिनेता किंवा अभिनेत्री मोठ्या प्रमाणावर चालते किंवा त्यांचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवतात अशा कलाकारांना प्रेक्षक नेहमीच फॉलो करत असतात.

मग यात त्या कलाकाराची स्टाईल असो कपडे असो किंवा त्यांची बोलण्या-चालण्याची पद्धत असो लोक या सर्व गोष्टींचे अनुकरण करतात. कलाकारांच्या कपड्यांबद्दल बोलायचे झाल्यास ते कोणतेही कपडे चित्रपटात घालतात त्यावेळी तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या फॅशनची एक ट्रेंड बनते.

असे अनेकदा झाले आहे जेव्हा चित्रपटात अभिनेता किंवा अभिनेत्री एका विशिष्ट प्रकारचे कपडे घातले असतात आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या कपड्यांची त्या चित्रपटावर एक वेगळीच छाप पडलेली दिसते. काही वेळेस एखाद्या विशिष्ट कपड्यांवरून तो चित्रपट ओळखला जातो.

याचे उदाहरण म्हणजे देवदास या चित्रपटातील माधुरीचा तीस किलो वजनाचा हिरव्या रंगाचा लेहंगा किंवा करीना कपूरचा हीरोइन या चित्रपटातील १४० वेगवेगळे कपडे घालण्याचा रेकॉर्ड. पण तुम्हाला ठाऊक आहे का चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्या चित्रपटात वापरले गेलेले कपडे पुढे काय केले जातात? जर माहित नसेल तर आज आम्ही याबद्दलच तुम्हाला सांगतो. काही वेळेस चित्रपटात वापरल्या गेलेल्या आयकॉनिक कपड्यांचा लिलाव केला जातो.

सिनेतारका आणि चित्रपटात वापरलेले कपडे लोकांना फार आवडतात हे लक्षात घेऊन पुढे या त्यांचा लिलाव केला जातो. देवदास या चित्रपटात माधुरी दीक्षित घातलेल्या लेहंगा चा लिलाव तीन करोड रुपयांना केला होता. तो लेहेंगा ३० किलो वजनाचा होता एवढा जवळ लेहंगा घालून माधुरी दीक्षितने मनमोहक डान्स केला. हा तीस किलो वजनाचा लेहंगा नीता लुल्ला या डिझायनरने बनवला होता. या लेहंग्याच्या लिलावातून आलेल्या पैशात द्वारे चॅरिटीला मदत करण्यात आली.

प्रेक्षक हे एखाद्या कलाकाराचे जबरदस्त फॅन असतात त्यामुळे त्यांनी घातलेले कपडे हे आपल्याकडे आठवण स्वरूपी राहावे अशी त्यांची इच्छा असते. तर काही वेळेस त्या चित्रपटातील एखाद्या पात्राने घातलेले कपडे एखाद्या प्रेक्षकाचे मन इतके मोहून टाकतात कि ते कपडे आपल्याकडेच असावे असे त्यांना वाटते. म्हणूनच प्रॉडक्शन हाउस सुद्धा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ते कपडे विकून टाकतात.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मुझसे शादी करोगी या चित्रपटात सलमान खानने वापरलेला टॉवेल त्याच्या एका चाहात्याने तब्बल दीड लाख रुपयांना खरेदी केला होता. हे आत्ताच नव्हे हे चाहत्यांनी कलाकारांचे वापरलेले कपडे खरेदी करणे हे खूप आधीपासून चालत आलेले आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्या चित्रपटात वापरलेले कपडे हे प्रोडक्शन हाऊस मध्येच ठेवले जातात जर त्या कपड्यांचा लिलाव झाला नाही किंवा कोणी ते कपडे खरेदी केले नाही तर ते कपडे एका बॉक्स मध्ये ठेवले जातात आणि त्या बॉक्सवर चित्रपटाचे नाव लिहिले जाते. नंतर त्याच प्रोडक्शन हाऊस मध्ये बनणाऱ्या पुढील चित्रपटात ज्युनियर आर्टिस्टला ते कपडे घातले जातात. ते कपडे मिस मॅच करून जुनिअर आर्टिस्ट ला घातले जातात त्यामुळे प्रेक्षकांना ते सहज लक्षात येत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *