किसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते विसरायचा प्रयत्न ! 

330392

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सदाबहार सौंदर्याची खाण समजली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितचा १५ मे वाढदिवस. माधुरीने बॉलिवूडमध्ये अनेक धमाकेदार चित्रपट केले. त्याच्या अभिनयावर भले भले लोक फिदा आहेत. मात्र अभिनयासोबतच ती उत्कृष्ट नर्तिका सुद्धा आहे. आज आम्ही माधुरी बद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत जि ती कधीच आठवू इच्छित नाही.

हा किस्सा माधुरी आणि विनोद खन्नाचा आहे. बॉलीवूड मध्ये माधुरी आणि विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले परंतु एका चित्रपटादरम्यान अशी एक गोष्ट घडली त्यामुळे ते पुन्हा कधीच एकत्र स्क्रीनवर दिसले नाहीत.

विनोद खन्ना आणि माधुरी दयावान या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. दयावान हा चित्रपट १९८८ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या सेटवर किसिंग सीन चित्रीकरण चालू होते. असे म्हटले जाते की या सीन दरम्यान विनोद खन्ना यांनी चुकून माधुरीच्या ओठांचा चावा घेतला.

खरेतर याआधी माधुरी अशाप्रकारचा इन्टिमेट सिन करण्यास राजी नव्हती कारण विनोद खन्ना वयाने माधुरी पेक्षा मोठे होते. त्यामुळे अशाप्रकारचे सिन करण्यास माधुरीला थोडी अडचण येत होती. मात्र दिग्दर्शकांनी समजूत काढल्यावर ती राजी झाली.

परंतु हा सीन करताना दिग्दर्शकांनी कट म्हणून सुद्धा विनोद खन्ना थांबले नाहीत आणि शेवटी त्यांनी माधुरीला चावले याच कारणामुळे तिने कधीच पुन्हा विनोद खन्ना सोबत काम केले नाही. या सर्व गोष्टींचा खुलासा खुद्द माधुरीने केले आहे.

माधुरीने सांगितले कि त्या सीनचे चित्रीकरण करताना ती खूप नर्वस होती. खरेतर नर्वस विनोद खन्ना सुद्धा होते पण अचानक त्याला काय झाले समजले नाही आणि त्यांनी तो सीन करताना चावले‌. या सर्व घटनेनंतर विनोद खन्ना यांनी माधुरीची माफी सुद्धा मागितली होती. मात्र आज सुद्धा माधुरी तो सीन विसरायचा प्रयत्न करते.

माधुरी दीक्षित चा जन्म १५ मे १९६७ ला झाला. माधुरी चे शिक्षण मुंबईतील डिव्हाईन चाईल्ड हायस्कूलमधून झाले.  त्यानंतर मुंबई विद्यापीठातून सूक्ष्म जीव तज्ञ बनायचे होते. शिवाय माधुरी तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे आठ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले आहे. माधुरीने अबोध या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता.

दयावान आणि वर्दी या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. मात्र तेजाब चित्रपटातील अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. तेजाब या चित्रपटासाठी माधुरीला पहिले फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन देखील मिळाले होते. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये काम केले.

दिल या चित्रपटात माधुरीने अमीर खानच्या नायिकेची भूमिका केली होती या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दिल चित्रपटानंतर माधुरीचा हिट चित्रपटाची रांग लागली. यानंतर तिने साजन, बेटा, खलनायक, हम आपके है कौन, राजा यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !