बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान वर्षाला कमावतो तब्बल एवढी रक्कम, वाचून तुम्हीही थक्क व्हाल !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूडचा रोमांस’चा बादशहा तसेच किंग खान म्हणून जगप्रसिद्ध असलेला अभिनेता शाहरुख खान श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शाहरुख खान व त्याच्या कुटुंबाचे उच्च राहणीमान, त्याची स्टाईल, त्याचे घर, त्याच्या गाड्या या सर्व महागड्या गोष्टींचा अंदाज बांधता तो महिन्याला बक्कळ पैसा कमवत असेल हे आपल्या लक्षात येईल.
शाहरुख खानची नेटवर्थ ८०० मिलियन डॉलर आहे. शाहरुख खानची वार्षिक कमाई ३८ मिलियन डॉलर इतकी आहे. शाहरुख खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या जास्त कमाई करत नसले तरीही तो प्रती चित्रपट ४० ते ५० करोड रुपये चार्ज करतो. याशिवाय शाहरुख खान अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करतो त्यामुळे त्या कंपनीमार्फत सुद्धा शाहरुख खान ला भरपूर पैसा मिळतो. मात्र शाहरुख खान च्या कमाईचा मुख्य स्त्रोत हे बॉलीवूड चित्रपट आहे.
शाहरुख खान बद्दल विशेष सांगायचे झाल्यास हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांच्या एकत्रित श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान एकमेव भारतीय अभिनेता आहे. शाहरुख खान टॉम क्रूज, टॉम हॅंक्स, क्लींट एस्टवूड या हॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा श्रीमंत आहे. शाहरुख खान केव्हा बॉलिवूड अभिनेता नसून तो टीव्ही इंडस्ट्रीमधील देखील एक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता व एक सामाजिक कार्यकर्ता आहे.

शाहरुख खान ला भारतातील यशस्वी अभिनेता मानले जाते. लाल मिर्च एंटरटेनमेंट आणि त्याची सहाय्यक कंपनी ड्रीम्स अनलिमिटेड या शाहरुख खानच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. याशिवाय शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल टीमचा जुही चावला व जय मेहता यांच्यासोबत सहमालक आहे.
शाहरुख खानला उंची लाईफस्टाईल जगायला आवडते त्यामुळे त्याचा अधिक तर कल हा महागड्या गाड्या व घरावर असतो. शाहरुख खान २२ करोड डॉलर वार्षिक कमाई करतो. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या तसेच मुंबई ,दुबई, लंडन येथे मोठी संपत्ती रिअल इस्टेट आहे.
शाहरुख खानच्या नेटवर्थमध्ये चित्रपट, ब्रँड, जाहिराती आणि व्यक्तिगत उत्पादने यांमधून पैसा येतो. शाहरुख खान कडे १२ करोड रुपयांची बुगाटी वेरॉन, बीएमडब्ल्यू ७ सिरीज, बीएमडब्ल्यू ६ सिरीज, मित्सुबिशी पजेरो, ऑडी ए6, लॅण्ड क्रुझर, रोल्स रॉयस ड्रॉप हेड कूप अशा महागड्या व लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.