Headlines

चॅटिंग मध्ये मुलीला इंप्रेस करायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा !

सध्याच्या काळात डेटींगची सुरुवात ही ऑनलाईन चॅटींगपासुन होते. हल्ली सोशल मीडियावर सगळेच जण सक्रिय असतात. तिथे वेगवेगळे मित्र मैत्रीण बनतात. एकमेकांशी ओळख नसतानाही, एकमेकांना पाहिले नसतानाही आता सोशल मीडियावर एकमेकांशी बोलता येते. पण तरीही काही मुलांना मुलींशी पहिल्यांदा चॅटींग करताना धाकधुक होते. त्यांच्यावर आपले इंप्रेशन कसे पडेल याची चिंता त्यांना खात असते.

पहिल्यांदा चॅटींग करताना समोरील व्यक्तीच्या आवडीनिवडी सवयी यांची माहिती नसते. त्यामुळे आपण काही बोललो तर समोरील व्यक्तीला ते आवडेल कि नाही ती आपल्याला ब्लॉक तर करणार नाही ना अशी धाकधुक लागलेली असते. एखाद्या चांगल्या टॉपिकवरुन बोलयला सुरुवात केली तर संभाषण दिर्घकाळ टिकते. जर तुम्हाला एखाद्या मुलीला चॅटवर इंप्रेस करायचे तर आज आम्ही तुम्हाला त्या संबधी काही टिप्स देणार आहोत.

नेहमी लक्षात ठेवा कि चॅटींग करताना मुलीला इंप्रेस करायच्या नादात कोणताही अशा मुद्द्यावर बोलु नका जी तो शक्यतो टाळत असेल. तिला तुमच्याशी बोलण्यात गुंतवा. बोलताना जर तुम्ही सतत स्वताबद्दलच सांगत बसलात तर एका पॉईंटला ती कंटाळेल आणि तुमच्यासोबत बोलण्याचा तिचा इंटरेस्ट कमी होईल. जर तुम्ही सुरुवातीपासुन तिला व्यक्त व्हायची संधी दिली नाहीत तर पुढे ती स्वताहुन आपले मन मोकळे करणारच नाही.

चॅटींगदरम्यान समोरच्या मुलीला तुम्ही बोअर वाटु नये यासाठी तुम्ही आधी असे विषय तिच्यासमोर काढणे टाळा. या ऐवजी तुम्ही तिच्या आवडीचे टिव्ही शो किंवा काही मनोरंजनात्मक गोष्टींबद्दल बोला. ती साहसी आहे का तिला रॉक क्लाइम्बिंग, बंजी जंपिंग सारख्या गोष्टी आवडतात का या गोष्टी जाणुन घ्या. तिला तिचा विकेंड कसा स्पेंड करायला आवडतो या बाबत जाणुन घ्या. तसेच तिला फिरायला जायला आवडते का.. असेल तर ती कोणत्या ठिकाणी फिरणे पसंत करते. तुम्हाला जर तिच्यासोबत तुमचे भविष्य काढायचे असेल तर तिच्या कलाने घेऊन हळु हळु तुमची ओळख वाढवा. घाईगडबडीत काहीही बोलु नका.

धीर धरा – पहिल्याच चॅटींगमध्ये मुलगी इंप्रेस होते असे नाही. त्यामुळे थोडा धीर धरा. तिला लाजाळुच्या झाडाप्रमाणे हळुहळु फुलु द्या. ती देखील तुमच्यासारखीच असु शकते. कदाचित तिला देखील पहिल्यांदा बोलते वेळी संकोच वाटु शकतो. त्यामुळे तिला उत्तर द्यायला थोडी जागा आणि वेळ द्या.

मोठेपणा करु नका – अधिकांश पुरुष चॅटींग करते वेळी एक चुक करतात ते म्हणजे मुलीला इंप्रेस करण्यासाठी स्वताबद्ल खोटे सांगणे. तुमचे एक छोटेसे खोटे भविष्यात तुम्हाला मोठ्या संकाटांना सामोरे जावे लागु शकते. कोणत्याही नात्यात खोटे बोलणे तुमच्यावर भारी पडु शकते. चॅटींगवाल्या रिलेशन मध्ये सरार्स खोटे बोलले जाते. पण तसे न करता कधीही इमानदारीच्या रस्त्याने चाला.

वेगळे बनण्याचा प्रयत्न करा – पहिल्या चॅटमध्ये एकमेकांचे करियर, एकमेकांच्या इच्छा – आकांक्षा , संपत्ती याबद्दल बोलले जाते. पण तुम्ही थोडे वेगळे करा. या गोष्टींबद्दल न बोलता थोडे हटके विषय निवडा जे बोलयला मुलीला इंट्रेस्ट असेल. तुमच्या क्रिएटिव्ह डोक्याला जरा ताण द्या आणि नवीन विषय काढा ज्यावर तुम्ही दोघेही छान गप्पा मारु शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !