Headlines

सापाबद्दल या माहित नसलेल्या गोष्टी नक्की पहा? जाणून घ्या साप बदला घेतात का ? दूध पितात का? आणि बरंच काही !

यावर्षी 2022 मध्ये नागपंचमी 2 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. नागदेवतेला पुजण्याचा सण काही ठिकाणी मनोभावे साजरा केला जातो. असे म्हणतात या दिवशी नागांची पुजा केल्यास मनातील सर्प भय कायमचे निघून जाते.

आपल्याकडे, जगात इच्छाधारी नाग असतात, सापांकडे मणि असतो, उडणारा साप पण असतो अशा अनेक ऐकिव गोष्टी बोलल्या जातात. उजैन येथील सर्प अनुसंधान केंद्राचे संचालक आणि सर्व विशेषतज्ज्ञ मुकेश इंगळे यांनी त्यांच्या पुस्तकात याबाबत विस्तारित लिहिले आहे. तर मग आज आपण नागपंचमीच्या निमित्ताने सापांसंबंधीत काही माहिती जाणणार आहोत.

साप दूध पितात का ? – सर्प विशेषतज्ज्ञ मुकेश इंगळेंच्या मते, साप हा के मांसहारी जीव आहे. तो पक्ष्यांची अंडी किंवा जमिनीवरील छोटे मोठे जीव जंतूंची शिकार करतो. त्यामुळे साप दूध पितो हे विधान अगदीच चुकीचे आहे. नागपंचमीला काहीजण सापांना दूध पाजून त्यांच्यावर अ’त्या’चा’र करत असतात. अशाने सापांचा अकाली मृत्यू होतो. त्यामुळे सापांना चूकुनही दूध पाजू नका.

इच्छाधारी साप असतात का ? – इच्छाधारी साप अस्तित्वात असतात असे अनेकांचे म्हणणे आहे. पण सर्व विशेषतज्ज्ञ मुकेश इंगळे ते नाकारतात. त्यांच्यामते इच्छाधारी सापवैगेरे या गोष्टी केवळ माणसांच्या अंधश्रद्धा आहेत. तसेच याविषयावर अनेक चित्रपटही आल्यामुळे अशा गैरसमजांना खतपाणी मिळते. पण हे खोटे आहे.

सापाकडे मणी असतो का ? – असे म्हटले जाते, सापांचे आयुष्य खूप मोठे असते, त्यांच्याकडे एक मणी असतो. पण ते चुकीचे आहे. मुकेश इंगळे यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, तमिळनाडूमधील इरुला जातीचे लोक साप पकडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनीही सापांकडे मणी असतो या विधानाला चुकीचे मानले आहे.

साप पुंगीच्या तालावर नाचतो का ? – अनेकदा सापांच्या खेळात किंवा तमाशांमध्ये साप पुंगीच्या तालावर नाचतात असे दाखवले जाते. पण ते खोटे आहे कारण सापाची नजर ही फिरत्या गोष्टींकडे जास्त पाहत असते. त्यामुळे जेव्हा पुंगी वेगवेगळ्या ठिकाणी फिरवली जाते तेव्हा साप त्या पुंगीवर लक्ष ठेवून असल्यामुळे त्याप्रमाणे आपले शरीर हलवतो.

दुतोंडी साप असतात का ? शरीर एक पण त्याला दोन तोंड असा दिसणारा साप असतो असे म्हटले जाते. पण मुकेश इंगळेंच्या मते कोणत्याही सापाला दोन तोंड नसतात. एका विशिष्ट जातीच्या सापाची शेपूट ही बारीक नसून जाड असते. काही लोक अशा सापांच्या शेपटीवर डोळ्यांसारखे चमणारे दगड ठेवतात. त्यामुळे पाहणाऱ्याला तो दोन तोंडांचा साप वाटतो.

साप बदला घेतात का ? – असे म्हणतात की साप आपल्या साथीदाराची ह’त्या करणाऱ्याचा बदला घेतो. या ऐकीव गोष्टीवर मुकेश इंगळे म्हणतात, साप हा अल्प बुद्धीचा प्राणी आहे. एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याइतका सापाचा मेंदू विकसित नसतो. त्याच्या कोणत्याही घटना लक्षात राहत नाही. त्यामुळे बदला वगैरे घेणे ही लांबचीच गोष्ट आहे.

साप संमोहित करु शकतो का ? – बऱ्याच चित्रपटांमध्ये असे दाखवले जाते की एखाद्याला संमोहित करून आपल्या नियंत्रणात आणण्याची सापाकडे अद्भूत शक्ती असते. पण ती ही एक अंधश्रद्धा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !