Headlines

सोलर एनर्जी ३ एच पी आणि ५ एच पी मोटार अत्यल्प दरात जाणून घ्या आत्ताचे दर !

भारत सरकारने अनेक नवनवीन योजना लोकहितासाठी अंमलात आणल्या आहेत. त्यापैकी एक योजना आहे, प्रधानमंत्री कुसुम योजना. महाकृषी ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजेनेअंतर्गत १,००,००० सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून सन २०२०-२१ पुरवठादार कंपन्या व दर प्राप्त झाले आहेत. या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा वाटप केल्यानंतर योजनेची अपेक्षित कार्यवाही सुरु होईल. तो पर्यंत कोटा शिल्लक असलेल्या जिल्ह्यांमध्ये अर्जदारांची प्राथमिक माहिती / नोंदणी करण्यात येत आहे.

राज्य शासनाचे सुकाणू समितीकडून जिल्हानिहाय पुरवठादारास वाटप झाल्यानंतर अर्जदारांना प्राधान्यक्रमानुसार SMS पाठवण्यात येतील. त्यानंतरच अर्जदारांची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्वीकारणे, कंपनी निवडणे व सौर पंप आस्थापित करणे ह्या बाबी शक्य होतील. याच कुसुम सोलर पंपाची नवीन किंमत याचबरोबर लाभार्थ्याला भरवायचा हिस्सा त्याच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत.

कुसुम सोलर पंप योजनेची अंमलबजावणी ही पंपाच्या किमतीसाठी आणि पुरवठादाराचा जो कोटा आहे याच्यासाठी प्रलंबित होती मात्र अखेर आता या पंपाच्या किमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्येच जे पुरवठादार आहे त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि लवकरच लाभार्थ्यांना पेमेंटचा भरणा करण्यासाठीचे ऑप्शन येणार आहेत. परंतु पेमेंट ऑप्शन येत असताना याच्यामध्ये जाहीर केलेल्या पंपाच्या किमती आहेत.

१. ३ एच. पी.च्या पंपासाठी १,९३,८०३ रुपये याप्रमाणे ५ एच. पी.च्या पंपासाठी२,६९,७४६ तर साडेसात एच. पी.च्या पंपासाठी ३,७४,४०२ रुपये एवढी किंमत जीएसटी सह निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिले तर लाभार्थ्याला जो हिस्सा भरायचा आहे, याच्या मध्ये ३ एच. पी.च्या पंपासाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत १७,०३० रुपये आणि जीएसटी २३५० रुपये असे एकूण १९३८० रुपये भरावे लागणार आहेत.

२. याचप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मूळ किंमत ८५१५ रुपये जीएसटी ची किंमत ११७५ रुपये असे एकूण ९६९० रुपये ३ एच. पी.च्या पंपासाठी भरावे लागणार आहेत. तर ५ एच. पी.च्या पंपासाठी जनरल, खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत २३,७०४ रुपये जीएसटी १३.८ टक्के २३ रुपये असे तब्बल २६,९७५ रुपये एवढी रक्कम भरणा करावी लागणार आहे. अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ एच. पी.च्या पंपासाठी मूळ किंमत ११८५२ रुपये आणि जीएसटीचे १६३६ रुपये असे एकूण १३,४८८ रुपये एवढा भरणा करावा लागणार आहे.

याप्रमाणे साडेसात एच. पी.च्या पंपासाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत ३२९०० रुपये भरावी लागणार आहे तर जीएसटी ४५४० असे एकूण ३७४४० रुपये भरावे लागणार आहेत आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना साडेसात एच. पी.च्या पंपासाठी १६४५० रुपये, त्याचबरोबर जीएसटीचे २२७० रुपये एकूण १८७२० रुपये भरावे लागणार आहेत
पण एकंदरीत पाहिलं तर ३ एच. पी.च्या पंपाला खुल्या प्रवर्गासाठी आणि साधारणपणे दीड हजार रुपयापर्यंत तर अनुसूचित जाती-जमातींना आठशे रुपये पर्यंत तर ५ एच. पी.च्या पंपासाठी साधारणपणे दोन हजार रुपये आणि साडेसात एच. पी.च्या पंपासाठी साधारणपणे तीन हजार रुपये एवढा भरणा आता वाढलेला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !