करोडो लोक जिच्या सौंदर्याचे दिवाणे आहेत ती साध्वी ‘जया किशोरी’ लवकरच अडकणार विवाहबंधनात !

15900

जर सध्या कोरोनाचे संक्रमण नसते तर आपल्या सौंदर्याने आणि कोकिळे सारख्या आवाजाने करोडो लोकांना दिवाणे बनवणारी युवा साध्वी जया किशोरी ही आता लग्न करून सासरी गेली असती. आता या सुंदर साध्वीचे लग्न नक्की कधी होईल हे सांगू शकत नाही मात्र असे बोलले जात आहे की कोरोनाचे संक्रमण पुढे वाढतच राहिले तर जयाकिशोरी चे लग्न येत्या दिवाळीच्या आसपास होऊ शकते.
याआधी तिचे लग्न मे महिन्यात होणार होते. तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नाची संपूर्ण तयारी देखील केली होती मात्र देशात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले. आपल्या सौंदर्यामुळे आणि मनमोहक आवाजामुळे जगभर प्रसिद्ध असणाऱ्या जयाकिशोरी च्या सोशल मीडियावर करोडो फॉलोवर आहेत. जेव्हा ती कथावाचन करते किंवा भजन गायला सुरुवात करते तेव्हा तिचे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात.
तिला मिळालेला गोड गळा ही तिच्यासाठी एक दैवी देणगी आहे. त्यामुळे ती भजन गाताना तिचा आवाज ऐकताक्षणी तेथे उपस्थित असलेले सर्व लोक नाचू लागतात. राजस्थान मधील सुजानगढ येथे १३ जुलै १९९५ ला जयाकिशोरी चा जन्म झाला. ती वयाच्या ६ व्या वर्षापासूनच भजन गात आहे. जयाला चित्रपट पाहण्यास खूप आवडतात तसेच ती जेवण सुद्धा उत्तम बनवते. या व्यतिरिक्त तिला क्रिकेट पाहण्यास सुद्धा आवडते. महेंद्र धोनी हा तिचा सर्वात आवडता खेळाडू आहे तर अभिनेत्रींपैकी सोनम कपूर तिला खूप आवडते. जया कुमारी कडे जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा ती दाल बाटी चूरमा स्वतः बनवते.
आजच्या काळात जयाकिशोरी ची गिनती टॉपच्या सेलिब्रेटीं मध्ये केली जाते. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत मात्र त्यापैकी तिला फॉर्च्यूनर ही गाडी जास्त आवडते. आठवड्याभराच्या कार्यक्रमासाठी ती दहा लाख रुपये फी घेते. आणि जर सिझन असेल तर फी ची किंमत दुप्पट असते. असे म्हटले जाते की जया किशोरी कडे शंभर करोड हून अधिक संपत्ती आहे. याव्यतिरिक्त उदयपूर येथील श्री नारायण सेवा संस्थान सोबत तिचा व्यापारिक संबंध सुद्धा आहे.
कॅलिफोर्निया येथील एका बिझनेस फॅमिली मधून असलेल्या २८ वर्षीय युवकाशी जया विवाह बंधनात अडकणार आहे. एका कार्यक्रमादरम्यान या दोघांची ओळख झाली होती त्यानंतर या ओळखीचे रुपांतर प्रेमात होत गेले. काही दिवसांपूर्वीच दोघांना एकत्र पाहिले गेले होते त्यावेळीच डाळीत कुठे तरी पाणी मुरत असल्याचा संशय लोकांना आला होता. त्या युवकाच्या नावाबद्दल आणि त्याच्या परिवाराबद्दल जयाच्या घरच्यांनी अजून कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही.
जयाच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्या मुलाची उंची ५.७ असून तो रियल इस्टेट सोबतच रेस्टॉरंटचा सुद्धा बिझनेस करतो. मुलाकडील परिवार हासुद्धा मुळचा राजस्थानचा आहे. जयाचे कुटुंब सध्या कोलकत्ता मध्ये वास्तव्यास आहे. या दोघांचे लग्न कोठे आणि कधी होईल हे अजून समजले नाही. तसेच लग्नानंतर जया भजनांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेईल की नाही हे आत्ताच सांगू शकत नाही. एका मुलाखतीमध्ये जयाने सांगितले होते की लग्नानंतर तिला खूप मुलांना जन्म देण्याची इच्छा आहे. तसे पाहायला गेले तर चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्यांना तिच्या सोबत लग्न करण्याची इच्छा होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !