IAS इंटरव्यू मधील हे प्रश्न तुम्हाला पाडतील विचारात.. ८ ला ८ वेळा लिहल्यास उत्तर येईल १०००, सांगा पाहू कसे !

bollyreport
4 Min Read

प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते कि त्यांनी अभ्यास करुन भरपुर शिकुन चांगला आधिकारी व्हाव. सध्याच्या काळात अनेक मुलांचे स्वप्न असते कि त्यांनी आयएएस ऑफिसर व्हावे. त्याचे हे स्वप्न पुर्ण व्हावे यासाठी हे तरुण खुप छान तयारी करतात. मात्र यात प्रत्येकालाच यश मिळतेच असे नाही.

यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानली जाते. जर कोणत्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास झाली तर ते कोणत्या योद्ध्या पेक्षा कमी नसतात. कारण आयएएस इंटरव्ह्युमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात कि समोरच्या कैंडिडेटला घाम फुटतो. कारण त्या इंटरव्ह्युमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे ऐकताना जरी साधारण वाटत असले तरी त्यांची उत्तर देताना मात्र खुप विचार करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगणार आहोत.

१. एखादी व्यक्ती सलग १० दिवस झोपल्याशिवाय राहु शकते का ? उत्तर- हो नक्कीच राहु शकतो कारण दिवसा माणसे कामावर जातात त्यामुळे कामावरून दमुनभागुन आल्यावर रात्री झोपतात. माणूस हा सहजासहजी रात्री झोपतो. कोणतीही व्यक्ती दिवसा झोपत नाही.

२) अशी कोणती गोष्ट आहे जी बाहेर फ्रिमध्ये मिळते आणि हॉस्पिटलमध्ये पैसे देऊन मिळते ?
उत्तर- या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑक्सिजन. कारण ऑक्सिजन बाहेर फ्रिमध्ये मिळतो. तर तोच ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये मात्र पैसे देऊन मिळतो.

३) अशी कोणती गोष्ट आहे जी १० रुपयांना मिळते पण त्यामुळे संपुर्ण खोली भरुन जाते? उत्तर- कदाचित हा प्रश्न वाचुन अनेकजण विचारात पडतील. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अगरबत्ती. जर तुम्ही १० रुपयांची अगरबत्ती खरेदी केलात त्याचा सुगंध संपुर्ण घरभर दरवळतो.

४) अशी कोणती गोष्ट आहे जी एकावेळी तुम्ही दुसऱ्यासोबत सुद्धा शेअर करु शकता आणि स्वत:कडे सुद्धा ठेवु शकता? उत्तर- हा प्रश्न वाचल्यावर तुम्हीसुद्धा विचारात पडाल की अशी कोणती गोष्ट असेल जी स्वत:कडेसुद्धा ठेवु शकतो आणि दुसऱ्यांनापण.. तर याचा उत्तर आहे शब्द. जो तुम्ही कोणालापण देता आणि स्वत:कडे सुद्धा ठेवता.

५. कॅल्क्युलेटर ला हिंदीत काय म्हणतात ? उत्तर- कॅल्क्युलेटर ही अशी गोष्ट आहे जी कधीही कुठेही वापरला जातो. मात्र त्याला हिंदीत काय म्हणतात याचा कोणी इतका विचार केला नसेल. कॅल्क्युलेटर ला हिंदीत गणक किंवा परिकलक म्हटले जाते. १७ व्या शतकापासुन या उपकरणाचा वापर कॅल्क्युलेटर म्हणुनच केला जात आहे.

६. अशी कोणती गोष्ट आहे जी पुरुष लपवुन आणि स्त्री दाखवत चालते ? उत्तर- हा प्रश्न वाचुन चक्रावुन गेला असाल ना. मनात वेगवेगळ्या विचारांनी कल्लोळ केला असेल कि अशी कोणती गोष्टी असेल बुवा जे पुरुष लपवतात आणि स्त्रिया दाखवत चालतात. तर याचे उत्तर आहे पर्स.

७) पाण्याला कुठलाच रंग का नसतो ? उत्तर- पाण्याला रंग का नसतो हा प्रश्न बहुतेकदा सगळ्यांनाच पडतो. कारण पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी रंगहिन आणि चवहिन असते. खरेतर पाणी ऑक्सीजन आणि हायड्रोजनच्या अणुंनी बनलेले असते. जे उर्जा शोषुन घेण्यास सक्षम नसते. त्यामुळे प्रकाश पडल्यावरसुद्धा पाणी रंगहीन दिसते.

८) आठला आठ वेळा लिहील्यास उत्तर एक हजार कसे येईल सांगा पाहु ? उत्तर- हा प्रश्न वाचल्यावर अनेकजण शाळेत शिकवलेली गणिती समिकरण आठवायला लागली असतील. पण या प्रश्नाचे उत्तर तुम्ही समता तितके कठीण नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 888+88+8+8+8= 1000.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.