Headlines

गर्लफ्रेंड सोबत हॉटेलमध्ये पोलिसांना सापडल्यावर घाबरू नका फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा !

तुमच्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी जर तुम्ही एखाद्या हॉटेल मध्ये थांबलात आणि अचानक तिथे पोलिसांची धाड पडली तर गांगरुन जाण्याची गरज नाही. अविवाही जोडपे जर हॉटेलमध्ये एकत्र राहत असेल तर तो काही गुन्हा नाही. तसेच हॉटेल मध्ये थांबलेल्या कोणत्याही अविवाहीत कपलला त्रास देण्याचा किंवा त्यांना अटक करण्याचा पोलिसांना कोणताच अधिकार नसतो.

सुप्रिम कोर्टाच्या सीनियर अॅडव्होकेट विनय कुमार गर्ग यांच्या मते, अविवाहीत जोडपे एकत्र हॉटेलमध्ये राहिले किंवा त्यांना त्यांच्या एकमेकांच्या सहमतीने शारिरीक संबंध ठेवण्याचा अधिकृत अधिकार आहे. पण त्यासाठी ते दोघेही मॅच्युअर असावेत एवढीच अट आहेत. संविधानत दिलेल्या अनुच्छेद २१ नुसार स्वताच्या मर्जीने कोणासोबत राहणे किंवा एखाद्या सोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे तसेच त्यासाठी कोणत्याही लग्नाची आवश्यकता नसल्याचे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले.

याचाच अर्थ जर एखादे कपल लग्न न करता हॉटेल मध्ये एकत्र राहत असतील तर त्यांचा तो अधिकृत अधिकार आहे. सीनियर अॅडव्होकेट विनय गर्ग यांच्या मते एखादे जोडपे हॉटेलमध्ये थांबले असताना पोलिसांनी जर त्यांना त्रास दिला किंवा अटक केली तर ते त्यांच्या अधिकृत अधिकारांचे उल्लंघन केले असे मानले जाईल. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात ते जोडपे थेट सर्वोच्च न्यायालयाकडे घटनेच्या कलम ३२ अंतर्गत किंवा उच्च न्यायालयात थेट कलम २२६ अंतर्गत गुन्हा नोंजवु शकतात.

सीनियर पोलिस अधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार केली जाऊ शकते – गर्ग यांच्या मते हॉटेलमध्ये असलेल्या अविवाहीत जोडप्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांविरोधात जिल्हा पोलिस अध्यक्ष किंवा त्यांच्या वरील पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली जाऊ शकते. याव्यतिरीक्त पीडित जोडप्याकडे मानवाधिकारआयोगाकडे तक्रार नोंडवण्याचा सुद्धा पर्याय आहे.
हॉटेलमध्ये थांबलेले जोडपे हे अविवाहीत आहे या मुद्दाच्या आधारे त्यांना त्या हॉटेलमध्ये थांबण्यापासुन कोणी रोखु शकत नाही.
जर एखाद्या हॉटेलने असे केल्यास ते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. याचा अर्थ असा की अविवाहित जोडपे हॉटेलचे भाडे भरून तिथे आरामात राहू शकतात. याशिवाय, भारतीय हॉटेल उद्योगाची सर्वोच्च संस्था हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाचासुद्धा असा कोणताही नियम नाही, जो अविवाहित जोडप्याला कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यास रोखु शकतो.

पोलिस हॉटेलमध्ये छापा का मारतात – एखाद्या अविवाहीत जोडप्याला त्रास देण्यासाठी किंवा त्यांना अटक करण्यासाठी पोलिस हॉटेलवर छापा मारत नाही. भारतात वे*श्या*वृ*त्ती हा अपराध मानला जातो. त्यामुळे एखाद्या हॉटेलमध्ये जर वै*शा व्यवसाय होत असल्याची पोलिसांना शंका आली तर ते हॉटेलवर छापा मारतात.
पोलिसांनी छापा मारलेल्या हॉटेलवर एखादे अविवाहित जोडपे थांबले असेल तर त्यांनी घाबरुन जायची गरज नाही. त्यावेळी ते त्यांच्या एकमेकांच्या सहमतीने हॉटेलवर थांबले आहेत तसेच ते कोणत्याही प्रकारच्या वै*शाव्यवसायात सहभागी नाही हे दाखवण्यासाठी त्यांना पोलिसांना त्यांचे ओळखपत्र म्हणजेच आयडी कार्ड दाखवावे लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !