क्रिकेट हा खेळ भारतीयांचा श्वास आहे. या खेळाचा सामना पाहताना भारतीय मंडळी तहान-भूक सगळे विसरून जातात
भारतीय क्रिकेट खेळ आणि त्यातील खेळाडू या साऱ्यांचे भारतीयांचेवएक अतुट विश्वसनीय असे नाते आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला बद्दल बोलायचे झाल्यास तर या संघांमध्ये ऑल राऊंडर आणि आपल्या शांत स्वभावाने सर्वांना हवाहवासा वाटणारा खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी.
महेंद्रसिंग धोनी ची ओळख सुरुवातीला लांब केस असणारा खेळाडू म्हणून सुद्धा लोक ओळखत असे पण सर्वीकडे स्वातंत्र्यदिनाचा आनंद उत्सव साजरा होत असतानाच महेंद्रसिंग धोनीने आपल्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी दिली.
चला तर जाणून घेऊया त्याबद्दल !
महेंद्र सिंह धोनी ने भारतीय क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान दिले आणि विश्व सुद्धा या योगदानाचे कौतुक करत राहिले आहे. तरुण मुलांचे रोल मॉडेल एमएस धोनी ने शांतिपूर्वक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. शानदार कर्णधार आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या माही ने शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या क्रिकेट विश्वामधून संन्यास घेण्याची माहिती दिली. १५ ऑगस्टला जेव्हा देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत होता, त्याच दिवशी क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला.
एम एस धोनी ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि यासोबत लिहले की, “नेहमी आपल्या प्रेम आणि सोबतीसाठी आभारी आहे”,”१९:२९ तासाने मला सेवानिवृत्त समजा !” या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित धक्का दिला, तसेच या बातमीने अनेक लोक विचारात पडले की भारतीय वेळेनुसार ठीक संध्याकाळी सात वाजून २९ मिनिटांनी संन्यास घेण्याचे नेमके काय कारण आहे ?
काय धोनीचे यावेळेस संन्यास घेण्यामागे काही विशेष असं कारण होते ? का कोणता मुहूर्त? की अजून काही ? जेव्हा आम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे निदर्शनास आले की, भारतीय संघ गेल्या वर्षी ९ जुलै रोजी विश्वकप मधून ठीक याच वेळी बाहेर पडला होता. एमएस धोनी हा शेवट या दिवशी क्रिकेट मैदानावरून फलंदाजी करून परतला होता. मार्टिन गप्टिल ने एमएस धोनीला बाद करून अनेक भारतीय चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. बाद झाल्यामुळे भारतीय संघाची हार निश्चित झाली होती. जेव्हा युजवेंद्र चहल शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला होता, तेव्हा भारतीय संघ आपल्या देशाच्या नुसार ठीक संध्याकाळी ०७.२९ ने विश्व कप सामना मधून बाहेर पडली होती. चहलच्या बाद होण्यानंतर काही क्षणांतच न्युझीलंडचे माजी ऑलराउंडर ग्रांट एलियट ने ट्वीट केले होते.
तसे तर एमएस धोनी ची संन्यास घेण्याबाबतची पोस्ट खूपच र ह स्य म य आहे. धोनी ने लिहले की, १९२९ तासाने मला संन्यास घेतलेला क्रिकेटर समजा. जर १९२९ तासाला जर दिवसात मोजले गेल्यास ते ८० दिवस होतात. या वर्षी आईपीएल ५३ दिवसाचा सामना रंगणार आहे. एमएस धोनीने याची ट्रेनिंग १५ ऑगस्ट पासून केली. आईपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबर ला होईल. जर या पोस्टबाबत विचार केला गेला तर ८० दिवसानंतर धोनीला माजी खेळाडू च्या रूपात ओळखले जाईल. असे वाटत आहे की, धोनी आपले शेवटचे आयपीएल खेळत आहे.
जर आपल्याला हा लेख आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
Bollywood Updates On Just One Click