हि आहे या भारतीय क्रिकेटरची पत्नी, सौंदर्य आणि साधेपणामुळे आहे प्रसिद्ध !

1194

भारतीय क्रिकेट टीमचा एकेकाळचा प्रसिद्ध फलंदाज वीरेंद्र सेहवाग ने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट सामने खेळले आहेत. वीरेंद्र सहवाग यांचा भारतीय टीममध्ये सहभागी होण्याची सफर खूप मुश्कील होती. कारण जेव्हा ते टीम इंडिया मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते तेव्हा आधीपासूनच तेथे अनेक स्पर्धक उपस्थित होते. त्यामुळे इतके प्रतिस्पर्धी असलेल्या परिस्थितीत सुद्धा निवडून येणे ही एक प्रकारचे आव्हान होते. आणि शेवटी ते या आव्हानात यशस्वी ठरले.
फक्त खेळाच्या मैदानावरच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा वीरेंद्र सेहवाग यांना अनेक सामन्यांना सामोरे जावे लागले होते. यातील मुख्य आव्हान होते ते म्हणजे स्वतःच्या गर्लफ्रेंडला पत्नी बनवणे. वीरेंद्र सेहवाग यांनी आरती अहलावत सोबत लग्न केले. आरती या वीरेंद्र यांच्या लग्नाआधी खूप काळापासून गर्लफ्रेंड होत्या. आरती दिसायला खूप सुंदर आहेत.
दोघे खूप काळ एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा होते. दोघांच्या सतरा वर्षांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर व्हायला १४ वर्षे लागली.
आरती आणि वीरेंद्र यांची जेव्हा पहिली ओळख झाली तेव्हा आरती केवळ १७ वर्षांच्या होत्या. सध्या आरती त्यांच्या सौंदर्या सोबतच साधेपणामुळे सुद्धा ओळखल्या जातात. अगदी साधे कपडे परिधान करून सुद्धा त्या स्टायलिश ड्रेस परिधान केल्या प्रमाणेच सुंदर दिसतात.
वीरेंद्र आणि आरतीच्या लग्नासाठी आधी या दोघांचे परिवार राजी नव्हते. कारण नात्यानुसार हे दोघे एकमेकांचे भाऊ बहीण लागतात. अशातच या दोघांनी लग्न करणे म्हणजे वावगे ठरणार होते. पण अशा वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाणे सेहवाग यांना खूप चांगल्या प्रकारे येते. खूप प्रयत्नानंतर दोघांचेही परिवार या लग्नासाठी तयार झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. वीरेंद्र आणि आरती यांचे लग्न २२ एप्रिल २००४ मध्ये झाले. आता या दोघांना दोन मुले आहेत.
सेहवाग आणि आरती दोघेही त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करत असतात. दोघांच्याही फोटोंना त्यांचे फॅन्स खूप लाईक सुद्धा करतात. तुम्हाला सुद्धा आरती आणि सेहवाग यांची जोडी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा.