आपल्या घराच्या भोवती लावा हि ४ झाडे, डास आणि माश्या तुमच्या घराकडे फिरकणार पण नाहीत !

bollyreport
4 Min Read

सध्या सर्वत्र उन्हाचा पारा इतका वाढलाय की अंगाची लाहीलाही होत आहे. सर्वच माणसे गरमीने खुप हैराण झाले आहे. गरमीमुळे घामुळं येण्याचे प्रमाण सुद्धा वाढते. पण या दिवसात गरमी सोबतच मच्छरचा त्राससुद्धा वाढला आहे. दुपारी डोक्यावरच्या कडक उन्हामुळे चिडचिड होते तर रात्री बाहेर गारव्यात बसायचे म्हटले तर मच्छरचा त्रास सहन करावा लागतो.

या मच्छरमुळे त्वचेवर लालसरपणा, पुरळ उठू लागते आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. यांवर उपाय म्हणुन आपण त्यावर वेगवेगळी केमिकलयुक्त पावडर , क्रिम लावतो. परंतु कितीही झाले तरी ते केमिकल असल्यामुळे त्वचेवर अपाय होण्याची शक्यता असते.

या सर्वावर काही नैसर्गिक उपाय देखील आहेत. डासांना आळा घालण्यासाठी तुम्ही घरातच काही रोपे लावु शकता. डास आणि माशांना विशिष्ट वनस्पतींमधून निघणारे सुगंध आणि तेल आवडत नाही. अशा वनस्पती डास किंवा त्यांच्या अळ्यांसाठी देखील विषारी असतात.

1) सिट्रोनेला – सिट्रोनेला ही एक नैसर्गिक वनस्पती आहे जीचा वापर डासांना दूर करण्यासाठी केला जातो. या वनस्पतीचे तेल पॅटिओ कॅण्डल्समध्ये देखील वापरले जाते, हॉटेलमध्ये गेल्यावर ,किंवा उघड्यावर कॅंण्डल लाईट डिनर करताना डास तुमच्याभोवती फिरू नयेत म्हणुन या कॅण्डल्स वापरल्या जातात . या वनस्पतीचे दुसरे नाव ‘ओडोमॉस’ आहे. बरेचदा मच्छर चावु नये यासाठी ही क्रिम आपण वापरतो.

सिट्रोनेला हे एक खोड आहे जे तुम्ही तुमच्या अंगणात लावू शकता. बहुतेक सिट्रोनेला उत्पादने या वनस्पतीपासून काढलेल्या सुगंधी तेलापासून बनविली जातात. काही संशोधनात असेही दिसून आले आहे की या तेलाचे दोन तासांत बाष्पीभवन होते, म्हणून त्याचं रोप लावणे हा एक चांगला पर्याय आहे.

2) निलगिरी – हे झाड त्याच्या पानांसाठी आणि त्यातुन निघणाऱ्या तीव्र सुगंधासाठी ओळखले जाते. निलगिरीची पाने आणि तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्ही याच्या पानांच्या मदतीने माश्या आणि डासांना सहजपणे घालवू शकता. त्याचा तीव्र वास माश्या आणि इतर कीटकांना मानवी शरीराजवळ येण्यास प्रतिबंधित करतो. निलगिरीचे वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्ही तुमच्या अंगणात लावू शकता. अन्यथा, त्याची पाने गोळा करुन ती जाळल्यास त्यातुन निघणाऱ्या धुरातुन डास आणि माश्या दूर राहतात.

3) लेमन ग्रास – चहामध्ये लेमन ग्रास टाकुन पिण्याचे आरोग्यदायी फायदेआपण सर्वच जण जाणतो. पण याच लेमन ग्रासच्या मदतीने तुम्ही डासांनाही दूर करू शकता. लेमनग्रासला सायम्बोपोगन सायट्रेटस असेही म्हणतात. फुलामध्ये सिट्रोनेला नावाचा घटक असतो, हे एक नैसर्गिक तेल आहे जे माश्या, डास यांसारख्या इतर कीटकांना दूर करते. लेमन ग्रासचे औषधी गुणधर्म देखील आहेत. लेमनग्रासमध्ये एक विषिष्ठ प्रकारचा खास सुगंध असतो त्यामुळेच प्रसाधने आणि विविध सुगंधी उत्पादनांमध्ये देखील त्याचा वापर होतो.

4) तमालपत्र – तमालपत्रचा वापर आपण स्वयंपाकासाठी मसाला म्हणुन करतो हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण माश्या आणि डासांपासून सुटका मिळवण्यासाठीही तमालपत्र फायदेशीर ठरते. तमालपत्रामध्ये तीक्ष्ण सुगंध असतो .त्याचे तेल आजूबाजूच्या कोणत्याही किटकां आपल्यापासुन दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

तुम्ही ते तुमच्या घराभोवती, बागेत, अंगणात किंवा बाहेर लावू शकता. जर तुम्ही आजूबाजूला एखादे रोप लावू शकत नसाल, तर तुम्ही तमालपत्र जाळून एका भांड्यात ठेवा आणि नंतर त्याचा धूर खोलीत पसरवा. यामुळे डासही पळून जातील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.