Headlines

डॉक्टर आपल्या दिवसाची सुरुवात बदाम आणि अक्रोड खाऊन का करतात, जाणून घ्या !

दिवसाची सुरुवात नेहमी प्रसन्न व्हावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. या साठी आपला मुड चांगला असणे गरजेचे असते. आणि मुड चांगला असण्यासाठी पोट पण भरलेले असणे गरजेचे असते. सकाळी भिजवलेले बदाम खावे असे म्हणतात. या पाठी सुद्धा काही कारणे आहेत ती एका न्यूट्रिशनिस्ट सांगितली.

त्या स्वता त्यांच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी आणि भिजवलेले बदाम खाऊन करतात. त्यामुळे त्यांना दिवसभराची उर्जा मिळते. भिजवलेले बदाम हार्मोन स्वास्थ्य करते. यासाठी बदाम रात्री ८ ते १० तास पाण्यात भिजवुन ठेवावे. यामुळे पोषणतत्वे शोषुन घेतली जातात. बदाम मधील विटामिन ई त्वचा आणि केसांच्या स्वास्थ्यासाठी मदत करते.

बदाम हे प्रोटीन, विटामिन ई आणि मैग्नीशियमने युक्त असतात. यामुळे आपली स्मरणशक्ती तेज होते. तसेच पचनात सुधार होतो. आणि कोलेस्ट्रॉल लेवल कमी होतो.

भिजलेल्या अक्रोडाचे फायदे – अक्रोड हे ओमेगा-3 फैटी एसिडचे चांगले स्त्रोत आहे. त्यातुन विटामिन ई, फोलिक एसिड, प्रोटीन आणि फाइबर सुद्धा मिळते. अक्रोड ला ब्रेन फुड म्हणुन सुद्धा ओळखले जाते कारण त्यामुळे ब्रेन फंक्शन अॅक्टीव्ह राहतात. या व्यतिरिक्त अक्रोड कैल्शियम, पोटेशियम, आयरन, कॉपर आणि जिंकचा पण चांगला स्त्रोत आहे. भिजवलेले अक्रोड खाल्यास मेटाबॉलिज्म वाढते. तसेच ब्लड शुगर लेवल नियंत्रित होते. तसेच ते वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते.

१. व्यायाम – व्यायाम हा तुमच्या दिनचर्येतला महत्वाचा हिस्सा असणे गरजेचे आहे. शारिरीक रुपात सक्रिय राहिल्यास तुम्ही अनेक आजारांपासुन दूर राहाल.

२.ध्यान – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण ताणतणावातुन जात असतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यात बाधा आणते. यासाठी दिवसातुन एकदा स्ट्रेस मैनेजमेंट एक्टिविटीज म्हणजेच ध्यान किंवा योगा करावा.

कॉफी सोडा – काही जण दिवसाची सुरुवात कॉफी पिऊन करतात. मात्र त्यामुळे डिहाइड्रेशन होते. चहा किंवा कॉफी पिण्यासाठी सकाळची वेळ चांगली नसते.

घरी तयार केलेला पौष्टिक नाश्ता खा – पॅक बंद असलेला नाश्ता करु नये. त्यात कृत्रिम रंग आणि साखरेचे वापर केलेला असतो. यापेक्षा पोहे, उपमा, मुंग डाळ चेला, इडली यांसारखे घरी तयार केलेले पदार्थ खावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी कूलमराठी  सहमत असेलच असे नाही.