Headlines

कोल्हापूरच्या पट्ठ्याने ५० बाय २५ फुटाचे होर्डिंग लावून काय केले बघा !

माणुस एकदा का प्रेमात पडला की ते प्रेम मिळवायला माणुस त्याच्याने जे शक्य होऊल ते सर्व काही करुन पाहतो. त्यावेळी त्याने लढवलेल्या शकलेची दाद द्यावी लागते. असाच एक प्रकार नुकताच कोल्हापुरात घडला. कोल्हापुर हे तिथल्या रांगड्या लोकांसाठी, मंदिरांसाठी , तांबड्या-पांढऱ्या रस्सासाठी आणि रंकाळ्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपण सर्वचजण जाणतो. पण कोल्हापुरच्या एका तरुणाने त्याच्या प्रेयसीला अनोख्या पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केले. त्याच्या या अनोख्या प्रपोजची संपुर्ण कोल्हापूरात चर्चा आहे.

कोल्हापूरच्या सौरभ कसबेकरने कोल्हापूर सांगली महामार्गावर ५० बाय २५ फुटाचे होर्डींग लावुन त्याची प्रेयसी उत्कर्षाला लग्नासाठी मागणी घातली. त्याची ही अनोखी पद्धत पाहुन उत्कर्षा देखील भारवुन गेली. सौरभ हा कोल्हापूरचा राहणारा आहे तर उत्कर्षा ही सांगलीची. दोघेही सांगलीच्या बुधगाव येथे वसंतदादा पाटील इंजिनीयरींग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनीयरींगचे शिक्षण घेत होते. विशेष म्हणजे दोघेही एकाच विभागातील असुनही त्यांची फारशी ओळख नव्हती. त्यामुळे कॉलेजमध्ये सुद्धा त्यांचे फारसे बोलणे होत नसायचे. पण सौरभला मात्र उत्कर्षा पाहत्याच क्षणी आवडली होती.

त्यामुळे भविष्यात हीच आपली धर्मपत्नी असेल असे सौरभने त्याच्या मनाशी पक्के केले. शिक्षणानंतर सौरभच्या घरच्यांनी त्यांच्यापाठी लग्नाचा तग्दा लावला त्यामुळे त्याने घरच्यांना उत्कर्षा विषयी माहिती दिली . सौरभची आवड लक्षात घेता त्याच्या घरच्यांनीही ती उत्कर्षाच्या घरी जाऊन तिला रितसर मागणी घातली. पण किती काळ लोटला तरी त्यांच्याकडुन प्रस्तावाला होकार काही येत नव्हता. त्यामुळे उत्कर्षाला हटके पद्धतीने लग्नासाठी मागणी घालयची असे सौरभच्या मनात आले. व ती कशी ते ही त्याने मनाशी पक्के केले.

पण ते करायच्या आधीच उत्कर्षाच्या घरुन होकार आला होता. पण तरीही सौरभने त्याचा प्लॅन वर्कआऊट करायचे ठरवेल. त्यासाठी त्याने कोल्हापूर सांगली महामार्गावर मॅरी मी उत्कर्षा असे होर्डींग लावले. अशा अनोख्या प्रकारच्या प्रपोजमुळे उत्कर्षा खुप भारावुन गेली व तिने तात्काळ सौरभला लग्नासाठी होकार दिला. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या होर्डींगज् चे आणि त्यांच्या प्रपोजचे फोटो व्हायरल होत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !