Headlines

खाकी वर्दीत वटपौर्णिमा साजरी करणे ही आमच्यासाठी गर्वाची बाब, महिला पोलिसांच्या कार्याला सलाम !

आपल्याकडे प्रत्येक सणवाराला एक विशेष महत्व आहे. काल झालेली वटपौर्णिमा हा महिलांसाठी विशेष सण असतो. या दिवशी सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची जीवोभावे पुजा करतात. आणि आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
वडाच्या झाडाला दोका गुंडाळून सात फेरे मारताना प्रत्येक स्त्रीच्या मनात आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना आणि पुढची 7 जन्म तोच पती हवा अशी विनंतरी चालू असते.

सध्या सगळ्या बायका या पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करतात. पण बाहेर काम करत असताना त्या त्यांच्या घराप्रति, किंवा संसाराप्रति असलेले कर्तव्य विसरत नाही. कामावर जाणाऱ्या बायकांनी देखील कालच्या वटपौर्णिमेचा व्रत केला होतो. या व्रताचे औचित्य साधून सगळ्या महिला छान साड्या नेसून मिरवत होत्या.

पण आपल्या शहरांचे गावाचे रक्षण करणाऱ्या पोलिस दलातील महिलांना असं नटण्या थटण्याच सुख मिळाले नाही. पण रामनगर पोलीस ठाण्यातील महिला आणि शहर पोलीसांतील महिलांनी देखील त्यांच्या हक्काचा हा सण वेळातवेळ काढून मोठ्या उत्साहात साजरा केला. या महिला पोलिसांनी त्यांच्या पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी त्यांनी कोणतीच रंगीत साडी नाही तर चक्क खाकीवर पुजा केली. या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियालर जोरदार व्हायरल होत आहे.

याबाबत सांगताना त्या महिला पोलिस म्हणाल्या, ‘कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही आज आपले संस्कारही जोपासले आहेत. परंपरेनुसार वटवृक्षाचे पूजन केले आहे. खाकी वर्दीत वटपौर्णिमा साजरी करणे ही आमच्यासाठी गर्वाची बाब असल्याच त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !