प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे या कारणामुळे आ’क’स्मि’क निधन !

1228

मराठी मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी मंगळवार ०९ ऑगस्ट रोजी समोर येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन (Pradeep Patwardhan Death) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी ०९ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्याचे निधन हृ’दय’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने मुंबईतील राहत्या घरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत.

अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रदीप पटवर्धन हे गिरगावात स्थायिक होते. त्यांनी कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केले होते. त्यानंतर कालांतराने ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.

मोरुची मावशी हे त्यांचं नाटक खूप गाजलं. याशिवाय त्यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

प्रदीप पटवर्धन यांनी एक फुल चार हाफ (१९९१), डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट. पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला अशा अनेक चित्रपटातूनं भूमिका साकारली होती. आमच्या टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !