Headlines

मला मारले, माझ्या छातीला हात लावायचा प्रयत्न केला, अभिनेत्री केतकी चितळेने केले गंभीर आरोप !

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. केतकीची ४० दिवसांनी जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जेलमधून बाहेर आल्यावर तिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने ठाण्याच्या जेलमध्ये असताना तिच्यासोबत कशाप्रकारे व्यवहार करण्यात आला याबद्दल सांगितले.

एका मुलाखतीत केतकीने सांगितले, मी जेलमध्ये असताना माझ्यासोबत छेडछाड केली गेली. मी साडी घातली होती. तेव्हा जबरदस्ती माझी साडी खेचण्याचा प्रयत्न केला. मी खाली पडली तेव्हा माझ्यावर अंडी , शाही , रंग फेकला गेला. माझ्या ब्रेस्टला हात लावण्याचा प्रयत्न केला गेला.

केतकी पुढे म्हणाली, मला वॉरेंट नसताना अटक करण्यात आली होती. मी काहीच चुकीचे केले नव्हते तरी माझ्यासोबत अशाप्रकारे व्यवहार करण्यात आला.

मी केवळ एक कविता पोस्ट केली म्हणून मला कोणतीही सूचना न देता अटक केली. मी कोणावर ही निशाणा साधला नव्हता पण लोकांनीच ती कविता शरद पवारांशी जोडली. आणि माझ्यावर २२ एफआयआर नोंदवले गेले.

केतकीने पोस्ट केलेल्या कवितेत ब्राम्हणांची अवहेलना करणारे शरद पवार असे म्हटले होते. केतकीने याआधी आंबटगोड, तुझं माझं जमेना यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.केतकी या आधीही तिच्या वैयक्तिक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !