Headlines

व्हाट्सअॅपला नवीन प्र’ति’स्प’र्धी म्हणून आलेले सिग्नल या ऍप चे, हे आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या !

मीडिया हल्ली आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. या कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे सर्वच गोष्टी सध्या डिजिटल झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्याकरिता सोशल मीडिया हे एकमेव साधन होते. टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप असे अनेक पर्याय मेसेजिंग अँपचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी व्हाट्सअँप हा सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ऍप आहे. त्यावर चॅट करणे, व्हाट्सअँप कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग करू शकतो. पण हल्ली व्हाट्सअँप मध्ये बदल होण्याची चर्चा सुरु आहे.

व्हाट्सअँपने आपलया प्रा’य’व्ह’सी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. लोकांच्या प्रा’य’व्ह’सी ला या बदलांमुळे धक्का बसू शकतो, असे काही बदल करण्यात आलेले आहेत. प्रत्येकाला आपली प्रायव्हसी हि महत्त्वाची असते. त्यामुळे व्हाट्सअँपच्या या बदलामुळे लोक नाराज होऊन टेलिग्रामकडे वळले आहेत. गेल्या २ दिवसात गुगल प्ले स्टोर आणि अँपल स्टोरवरून १ लाखाच्या वर लोकांनी सिग्नल नावाचे एक नवीन अँप डाउनलोड केले आहे.

व्हाट्सअँपला मागे टाकत सर्वाधिक डाउनलोड होणार अँप म्हणून सिग्नल समोर आला आहे. एलन मास्क यांच्या ‘युज सिग्नल!’ या ट्विटमुळे सिग्नल अँप लोकांच्या परिचयाचा झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एलन मास्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. थेट मंगळावर नवी सृष्टी निर्माण करण्यासाठी धडपडणारा व्यक्ती अशी ही त्यांची ओळख आहे. पण सिग्नल व्हाट्सअँप पेक्षा किती सुरक्षित आहे किंवा हे सिग्नल अँप नेमकं कसं आहे, हे आज आपण जाणून घेऊया !

सिग्नल हे अँप iOs, अँड्रॉईड आणि विंडोजवर उपलब्ध आहे. व्हाट्सअँप प्रमाणे आपण यावर मेसेज फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स पाठवू शकतो. हे अँप एन्ड टू एन्ड ए’न’क्रि’प्श’न’चा वापर करते. जेणेकरून आपला डेटा सुरक्षित राहतो. ए’न’क्रि’प्श’न म्हणजे एखाद्या डाटाला कोडमध्ये रूपांतरीत करणे.

व्हाट्सअँप आणि सिग्नलचे डेटा स्टोरेज – व्हाट्सअँपच्या नव्या प्रा’य’व्ह’सी पॉलिसीमुले आपला डेटा सुरक्षित नसल्याचे आपल्याला कळले. तथापि, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे असे म्हटले गेले आहे की कंपनी आपल्या वैयक्तिक डेटामध्ये छे*ड*छा*ड करणार नाही. पण तरीही व्हाट्सअ‍ॅपने आपली मूळ कंपनी फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत बराच डेटा शेअर केला आहे. त्याच वेळी, सिग्नल जगातील सर्वात सुरक्षित अ‍ॅप्सपैकी एक मानला जातो. या अ‍ॅपमध्ये वापरकर्त्याचा डेटा सामायिक केलेला नाही.

सिग्नल अ‍ॅप आपला वैयक्तिक डेटा विचारत नाही. तसेच, सिग्नलवरील आपला चॅट बॅकअप ऑनलाइन संचयनास पाठवित नाही. आपला डेटा आपल्या फोनमध्ये सेव्ह राहतो. विशेष म्हणजे सिग्नलमध्ये बरीच सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत जसे की त्यात डेटा लिं’क्ड टू यू नावाचे फिचर आहे, यात कोणीही चॅट्सचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. सिग्नलचा आणखी एक विशेष मुद्दा म्हणजे जुने संदेश येथे आपोआपच अ’दृ’श्य होतात. व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे, एखादा गट तयार करुन कोणीही आपल्याला येथे जोडू शकत नाही.

प्रथम आमंत्रण पाठवावे लागेल. यात एमएमएसची देखील सुविधा आहे. तुमचा जसा रिचार्ज असेल त्यानुसार तुम्ही एस एम एस करू शकता. सिग्नलवर ग्रुप कॉल करता येतो, तब्बल १५० लोकांसोबत तुम्ही ग्रुप कॉलवर बोलू शकता. सिग्नल मध्ये रिले कॉल असे एक फिचर आहे जेणेकरून सिग्नल सर्व्हरवर आपला कॉल येतो, त्याचा फायदा असा की आपला आय पी पत्ता कॉल प्राप्त करणार्‍या व्यक्तीस मिळत नाही. आपली इच्छा असल्यास, आपण सुरक्षेसाठी त्यात एक पिन देखील सेट करू शकतो. पण एकदा का पिन विसरले तर त्याला रिकव्हर करता येणार नाही. हे कोणालाही आपल्या खात्यात प्रवेश करण्याची परवानगी देत नाही.

सिग्नलवर स्क्रीनलॉक सारख्या पर्यायांबरोबरच मेसेज अपोआप डिलीट करण्याचाही पर्याय आहे. म्हणजे तुम्ही मेसेज सोबत एक ए’क्स’पा’य’री डेट ठरवू शकता. अमुक एका तारखेपर्यंतच तो मेसेज समोरच्या व्यक्तीला दिसेल, त्यानंतर तो अपोआप डिलीट केला जाईल. याखेरीज मेसेजमध्ये येणाऱ्या लिक्सच्या प्रिव्ह्यूज बंद करता येणं शक्य आहे. तसेच तुम्ही मेसेज कधी वाचला याची वेळ लपवता येऊ शकते.

तुम्ही टायपिंग करत आहात हे समोरच्याला दिसावं किंवा नाही हे देखील तुम्हाला ठरवता येणार आहे. सिग्नल आपला फोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती सोडून कुठलीही प्रायव्हेट माहीती जमा करत नाही. एवढेच नाहीतर आपण चॅट्सचे बॅकअ‍प देखील करू शकत नाही.

व्हाट्सअँपचे खालील फिचर सिग्नलमध्ये उपलब्ध नसतील – 
१. स्टेटस अपडेट – व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक वापरले जाणारे फिचर म्हणजे स्टेटस फीचर, पण जर आपण सिग्नल अँप वापरण्यास सुरुवात केली तर आपल्याला हे फीचर इथे मिळणार नाही.

२. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स – व्हॉट्सअ‍ॅपचे आणखी एक वेगळं फिचर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फीचर. हे वैशिष्ट्य आल्यानंतर आपण आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्याही यूपीआय युझरला पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या, सिग्नलला असा कोणताही पर्याय नाही.

३. वॉलपेपर – आपण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वॉलपेपर फिचर देखील वापरतो. आपण वेगवेगळ्या चॅट्समध्ये वॉलपेपर ठेवू शकतो. परंतु सध्या सिग्नलवर अशी कोणतीही सुविधा मिळणार नाही.

४. ऑनलाईन – जेव्हा आपण व्हॉट्सअ‍ॅप सुरु करतो तेव्हा आपल्याला आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले जे व्हाट्सअँपवर ऍक्टिव्ह असतात ते ऑनलाईन दिसतात. याचा फायदा हा आहे की आपण ऑनलाइन असलेल्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. परंतु हे वैशिष्ट्य सिग्नलवर उपलब्ध नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !